Dwived Bravo's desire to remain incomplete for 12 years; Chat to the top Bollywood actress! | १२ वर्षांपासून ड्वेन ब्रावोची अपूरी राहिली इच्छा; बॉलिवूडच्या या टॉपच्या अभिनेत्रीशी करायचे चॅट!

चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार आॅलराउंडर ड्वेन ब्रावोने नुकतेच क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या टॉक शोमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी ब्रावोने त्याच्या आयुष्याशी निगडित अनेक खुलासे केले. एवढेच काय तर त्याने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्याविषयी असे काही म्हटले जे जाणून अभिनेता रणवीर सिंगला नक्कीच खटकणार. 

शोमध्ये जेव्हा ब्रावोला विचारण्यात आले की, त्याचे फेव्हरेट अभिनेत्री कोण आहे? तर त्याने सांगितले की, मी गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेत्री दीपिका पादुकोणचा मोठा चाहता आहे. पुढे बोलताना ब्राव्होने म्हटले की, मी दीपिकाला यापूर्वी भेटलो आहे, परंतु मला तिला पुन्हा भेटण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर तिच्यासोबत बसून चॅट करण्याची माझी इच्छा आहे. ब्रावोने सांगितले की, जेव्हा मी पहिल्यांदा २००६ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतात आलो होते तेव्हा हॉटेलमध्ये चेकइन केल्यानंतर टीव्ही सुरू केला होता. टीव्ही सुरू करताच त्यावर एक जाहिरात दाखविण्यात आली. त्या जाहिरातील दीपिका दिसत होती. तेव्हापासूनच मी तिचा चाहता झालो. खरं तर २००६ ची ती गोष्ट मला अजूनही वारंवार आठवते. त्यानंतर भज्जीने त्याला विचारले की, तुला --- मध्ये एखादी दीपिका नाही मिळाली काय? यावर हसत उत्तर देताना ब्रावोने सांगितले की, ‘तुम्ही दुसरी दीपिका शोधूच शकत नाहीत.’

हरभजनने पुढे ब्रावोला बॉलिवूडमधील बेस्ट अ‍ॅक्टरविषयी विचारले, तेव्हा त्याने किंग शाहरूख खानचे नाव घेतले. त्याने सांगितले की, ‘माय नेम इज खान’ माझा फेव्हरेट चित्रपट आहे. दरम्यान, ब्रावोने यापूर्वीदेखील दीपिकाविषयीचे आपले प्रेम व्यक्त केले आहे. आता पुन्हा एकदा त्याने दीपिकाबद्दलच्या प्रेमाची कबुली दिली. 
Web Title: Dwived Bravo's desire to remain incomplete for 12 years; Chat to the top Bollywood actress!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.