During the shooting of Padmavat, Deepika Padukone has to repeat 'O' work | पद्मावतच्या शूटिंग दरम्यान दीपिका पादुकोण वारंवार करायची 'हे' काम

गेल्या अनेक दिवसापांसून दीपिका पादुकोण कधी पद्मावत मुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. पद्मावतची शूटिंग सुरु झाल्यापासून ते रिलीज होईपर्यंत वेगवेगळ्या गोष्टीमुळे चित्रपटाची सतत चर्चा होती. दीपिकाने घातलेले भरजरी कपडे दागिने या गोष्टी ही कुतूहलाचा विषय ठरल्या. पद्मावतमध्ये तिने साकारलेल्या भूमिकेचे ही सर्व स्तरातून कौतुक झाले. दीपिकाने हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.  दीपिकाने दिलेल्या मुलखतीत ती म्हणाली, शूटिंगच्या वेळी खूप उष्णता होती, त्यात जड कपडे आणि दागिन्यांमुळे मी खूप त्रस्त व्हायची त्यामुळे मी व्हॅनिटी वॅनमध्ये जाऊन अंघोळ करायचे आणि नंतर पुन्हा शूटिंगला सुरुवात करायचे.   

दीपिकाने बाजीराव मस्तानीमध्ये साकारलेली मस्तानी असो किंवा पद्मावत मधील राणी पद्मावती असो दोन्ही भूमिकांवर तिने आपली छाप सोडली आहे. फराह खानच्या ओम शांती ओम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या दीपिकाने या चित्रपटानंतर कधी मागे वळून पाहिलेच नाही. प्रत्येक भूमिकेला ती न्याय दिला. राणी पद्मावतीमधील ऐतिहासिक भूमिका साकारल्यानंतर तिने आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिला एका इव्हेंट दरम्यान भविष्यातही तू ‘पद्मावत’सारखे चित्रपट करणार का? असा प्रश्न तिला केला गेला. यावर ‘इतना सब होने के बाद कभी नहीं,’ असे उत्तर दीपिकाने दिले. करणी सेनेच्या धमक्या आणि विरोधानंतर मी स्वत:ला सांभाळू शकते, याची माझ्या पालकांना पूर्ण खात्री होती. योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरक त्यांनी आम्हा दोघी बहिणींना शिकवला आहे. सत्यासोबत खंबीरपणे उभे राहायचे त्यांनी आम्हाला शिकवलेय. मी तेच केले, असेही ती म्हणाली. 

ALSO READ :   वडिलांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड मिळल्यानंतर दीपिका पादुकोणच्या डोळ्यात आले अश्रू, पाहा व्हिडिओ !

गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या चर्चा ही चांगल्याच रंगल्या आहेत. मात्र या दोघांनी अधिकृतरित्या याबाबत काहीही सांगितलेले नाही. मात्र लवकरच ते लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे समजते आहे. आता खरचं ते लग्न करतायेत की नाही हे आपल्याला लवकरच कळेल. 

Web Title: During the shooting of Padmavat, Deepika Padukone has to repeat 'O' work
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.