तर या 'कारणा'मुळे संजय दत्तने रिजेक्ट केला 'टोटल धमाल'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:05 PM2018-08-24T15:05:12+5:302018-08-24T15:13:47+5:30

संजय दत्त 'धमाल' या सुपरहिट सिरीजचा भाग होता. आता 'टोटल धमाल'मध्ये संजय दत्तच्या जागी अजय देवगण दिसणार आहे.

Due to this reason, Sanjay Dutt reject 'Total Dhamal' | तर या 'कारणा'मुळे संजय दत्तने रिजेक्ट केला 'टोटल धमाल'

तर या 'कारणा'मुळे संजय दत्तने रिजेक्ट केला 'टोटल धमाल'

ठळक मुद्दे ‘टोटल धमाल’ हा सिनेमा ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे 'मुंगडा' गाण्याचे रिमेकमध्ये सोनाक्षी दिसणार आहे

संजय दत्त 'धमाल' या सुपरहिट सिरीजचा भाग होता. आता 'टोटल धमाल'मध्ये संजय दत्तच्या जागी अजय देवगण दिसणार आहे. दिग्दर्शक इंदर कुमारची इच्छा होती की संजय दत्तने या सिनेमात स्पेशल अपियरेंस द्यावे. इंदरला वाटले की त्याच्यासोबत असलेल्या संजय दत्तच्या मैत्रीमुळे तो  या सिनेमात देखील काम करायला नकार देणार नाही. मात्र संजयने काम करण्यास नकार दिला.  


रिपोर्टनुसार संजय दत्त सध्या आपला आगामी सिनेमा 'प्रस्थानम'च्या शेड्यूलमध्ये बिझी आहे त्यामुळे त्याने टोटल धमालमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. मात्र संजय दत्त इंदर कुमारवर नाराज असल्याने सिनेमात काम करण्यास नकार दिल्याच्या चर्चा होतायेत. 


संजय दत्तला 'टोटल धमाल'ध्ये एक चांगली भूमिका हवी होती मात्र दिग्दर्शकाने त्याला फक्त कॅमिओ ऑफर केला त्यामुळे नाराज झालेल्या संजयने ही ऑफर नाकारली.  ‘टोटल धमाल’ हा सिनेमा ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. या फ्रेंचाइजीचा दुसरा सिनेमा ‘डबल धमाल’ होता. ‘टोटल धमाल’ ७ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अरशद वारसी आणि जावेद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर सोनाक्षी फक्त या गाण्यापुरती सिनेमात झळकणार आहे.१९७१ साली प्रदर्शित झालेल्या राज एन सिप्पी यांच्या 'इनकार' या सिनेमातील 'मुंगडा' गाण्याचे रिमेक या सिनेमात दिसणार आहे. वारसी, बोमन इराणी आणि संजय मिश्रा यांच्या भूमिका आहेत. तर सोनाक्षी फक्त या गाण्यापुरती चित्रपटात झळकणार आहे.  पुढच्या आठवड्यात या गाण्याच्या शूटिंगला सुरुवात होणार असून त्याला नवा टच कशाप्रकारे देता येईल, यावर काम सुरू आहे. या गाण्याच्या अखेरीस अजय देवगणसुद्धा झळकणार असल्याची माहिती आहे  
 

Web Title: Due to this reason, Sanjay Dutt reject 'Total Dhamal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.