This dress is trolled by Swara Bhaskar; Users 'Washing Powder Nirma'! | या ड्रेसवरून ट्रोल होतेय स्वरा भास्कर; यूजर्सनी म्हटले ‘वॉशिंग पावडर निरमा’!

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. आता स्वरा तिने परिधान केलेल्या ड्रेसवरून ट्रोल होत आहे. स्वराने परिधान केलेल्या ड्रेसची तुलना चक्क निरमा डिटरजंट पावडर या जाहिरातीमधील पोस्टर गर्लशी केली जात आहे. मात्र स्वराने या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करताना सोशल मीडियावर या आउटफिटमधील काही फोटोही शेअर केले आहेत. सध्या स्वरा तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. स्वराचा हा फोटो ‘वीरे दी वेडिंग’च्या म्युझिक लॉन्च इव्हेंटप्रसंगीचा आहे. या इव्हेंटमध्ये स्वरा भास्करने पांढºया रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता. 
 

सोशल मीडियावर स्वराचा हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, तिची तुलना निरमा गर्लशी केली जात आहे. मिनिस्ट्री आॅफ बॉलिवूड नावाच्या सोशल मीडिया हॅण्डलने स्वराचा हा फोटो निरमा गर्लशी जोडून शेअर केला. तिच्या या फोटोला कॉमेण्ट देताना एका यूजरने लिहिले की, ‘दूध सी सफेदी निरमा से आए रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘नीरमावाली दीदी मिळाली.’ स्वराने या फोटोवर उत्तरही दिले. तसेच तो फोटो सोशल मीडियावरही शेअर केला. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, खूप छान आॅबजरवेशन, या फोटोमुळे मला माझे लहानपणीचे स्वप्न आठवले. मला लहानपणापासूनच वॉशिंग पावडर निरमा गर्ल बनायचे होते. 



दरम्यान, स्वराचा हा ड्रेस atelier zuhra फॅशन ब्रॅण्डने डिझाइन केला आहे. दरम्यान, स्वरा ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात अतिशय बिंधास्त अंदाजात बघावयास मिळणार आहे. चित्रपटात अतिशय बोल्ड डायलॉग असून, चार बिंधास्त तरुणींची कथा त्यात दाखविण्यात येणार आहे. स्वरा व्यतिरिक्त करिना कपूर-खान, सोनम कपूर आणि शिखा तल्सानिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 
Web Title: This dress is trolled by Swara Bhaskar; Users 'Washing Powder Nirma'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.