अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाविषयी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. अक्षयचा हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. पॅडमॅन या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाची निर्मिती अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाची आहे. ट्विंकल आणि अक्षयने २००१ मध्ये लग्न केले. त्यांना आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. अक्षय आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. तो गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक हिट चित्रपट देत आहेत. अक्षयचे चित्रपट म्हटले की, ते बॉक्स ऑफिसवर हिट ठरणारच याची खात्री त्याच्या फॅन्सना असते. अक्षयने आजवर कॉमेडी, अॅक्शन अशा सगळ्याच प्रकारच्या चित्रपटात काम केले आहे. 

akshay kumar home

akshay kumar home

akshay kumar home

akshay kumar home

akshay kumar home

akshay kumar home

अक्षय वर्षाला दोन-तीन चित्रपटात तरी काम करतो. त्यामुळे तो त्याच्या कामात प्रचंड व्यग्र असतो. पण तो कितीही कामात बिझी असला तरी तो त्याच्या कुटुंबियांना पहिले प्राधान्य देतो. तो जास्तीत जास्त वेळ हा त्याच्या कुटुंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. अक्षय जुहूत त्याच्या कुटुंबियांसोबत राहातो. या घरात अक्षय, नितारा, आरव यांच्यासोबतच त्यांचा जर्नम शेफर्ड जातीचा कुत्रा देखील राहातो. त्याचे घर हे अलिशान आहे. या घराचे इंटेरियर स्वतः ट्विंकल खन्नाने बनवलेले आहे. तिने जगभरातील विविध भागांमधून हे इंटेरियर स्वतः आणलेले आहे. त्याचा फ्लॅट हा ड्युप्लेक्स असून पहिल्या फ्लोअरवर किचन, होम थिएटर, ट्विंकलचे ऑफिस, लिव्हिंग रूम, डायनिंग रूम आहे तर दुसऱ्या फ्लोअरवर बेडरूम, पॅन्ट्री, अक्षय आणि ट्विंकलचे ऑफिस आणि बाल्कनी आहे. या बाल्कनीमध्ये अनेकवेळा अक्षय त्याच्या मुलांसोबत खेळताना दिसतो. त्याच्या बिल्डिंगच्या समोरच अथांग समुद्र आहे. 
अक्षय हा एकमेव अभिनेता आहे जो रविवारच्या दिवशी काम करत नाही. रविवारचा त्याचा वेळ हा केवळ त्याच्या कुटुंबियांसाठी असतो. रविवारी तो त्यांच्यासोबत घरातच वेळ घालवतो अथवा त्यांना घेऊन फिरायला जातो. 

Also Read : ​अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटाचा टीजर आऊट
Web Title: Do you see the pictures of Akshay Kumar's elite house?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.