अभिनेता सनी देओल काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. परंतु तो त्याच्या परिवाराला नेहमीच सोशल मीडियापासून दूर ठेवतो. सध्या तो मुलगा करण याच्या डेब्यू चित्रपटामध्ये व्यस्त असून, त्यासंबंधीत काही फोटोज तो सोशल मीडियावर शेअर करीत असतो. परंतु सनीच्या चाहत्यांकडून एक प्रश्न नेहमीच विचारला जातो, तो म्हणजे सनी देओलच्या पत्नीचा फोटो कोणीच बघितला नाही? शिवाय त्याच्या पत्नीचे नाव काय? हे देखील त्याच्या चाहत्यांसाठी एक कोडंच म्हणावं लागेल. असो, आता आम्ही सनीच्या चाहत्यांची ही अडचण दूर करणार असून, त्याच्या पत्नीचे फोटो आणि नावही सांगणार आहोत. खरं तर सनीपाजीच्या पत्नीचा फोटो मिळविणे म्हणावे तेवढे सोपे नव्हते, बरीचशी शोधमोहीम घेतल्यानंतर सनी आणि त्याच्या पत्नीचे काही जुने फोटो मिळविता आले. सनी आणि त्याची पत्नी पूजा देओल यांचे हे लग्नावेळचे फोटो आहेत. खरं तर सनी देओलने नेहमीच पत्नी पूजाला मीडियापासून दूर ठेवले. त्यामुळे पूजाबद्दल कुठल्याही प्रकारची अपडेट समोर येत नाही. सनी देओलच्या परिवारातील आणखी सदस्य लाइमलाइटपासून दूर आहे. होय, करणला आणखी एक भाऊ असून, त्याचे नाव राजवीर आहे. राजवीर कधीही कॅमेºयासमोर आला नसल्याने त्याच्याबद्दलही कोणाला फारशी माहिती नाही. 

पूजा देओलविषयी बोलले जाते की, ती एक हाउसवाइफ आहे. त्यामुळेच ती कधीच कुठल्या बॉलिवूड पार्टी किंवा इव्हेंटमध्ये जात नाही. आणखी एक धक्कादायक बाब तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. कदाचित हे वाचून तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु हे खरं आहे. सनीचे पहिले लग्न एक बिझनेस अ‍ॅग्रीमेंट होते. कारण सनीचा ‘बेताब’ रिलीज होण्याअगोदरच त्याच्या लग्नाची बातमी समोर यावी, अशी धर्मेंद्र यांची इच्छा नव्हती. कारण लग्नाची बातमी समोर आली असती तर, सनीच्या रोमॅण्टिक इमेजवर परिणाम झाला असता. त्यामुळे हा चित्रपट रिलीज होईपर्यंत पूजा लंडनलाच राहात होती. त्यावेळी सनी नेहमीच पूूजाला भेटण्यासाठी लपूनछपूून लंडनला जात असे. 
Web Title: Do you see the photograph of Dashing Sunny Deol's wife? See if not!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.