Do you see Kapil Sharma's 'Firangi' poster? | ​कपिल शर्माच्या ‘फिरंगी’चे पोस्टर तुम्ही पाहिले?

कॉमेडियन कपिल शर्मा सध्या टेलिव्हिजनपासून दूर आहे. पण मोठ्या पडद्यावर येण्याची त्याची तयारी जोरात सुरू आहे. होय, कपिल शर्माचा दुसरा चित्रपट ‘फिरंगी’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. आज या चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करण्यात आले. चित्रपटाच्या शीर्षकावरून हा चित्रपट इंग्रजांच्या कुठल्याशा मुद्यावर आधारित असल्याचे कळते. या चित्रपटात कपिलने हिंदीला महत्त्व देत, इंग्रजी भाषेचा धुव्वा उडवला आहे. पोस्टरमध्येही हेच दिसतेय. कपिल शर्मा कुठल्याशा इंग्रजाला लाथ मारून पिळावून लावताना यात दिसतोय. चित्रपटात स्वातंत्र्यापूर्वीची कथा आहे, असे हे पोस्टर सांगते. पण सूत्रांच्या मते, यात प्रेमाचा एक कोणही आहे. कपिल शर्मा एका देशी मुलीच्या प्रेमात पडतो. पण ही मुलगी पुढे इंग्रजी भाषेच्या प्रेमात पडते. आपले प्रेम मिळवण्याच्या नादात कपिल इंग्रजी राजवटीविरोधात मैदानात उतरतो, असे या चित्रपटाचे कथानक असल्याचे कळतेय. या चित्रपटात दोन नायिका आहेत. एक तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्ता आणि दुसरी मोनिका गिल. दोघीही लीड भूमिकेत आहे. कपिलचा ‘जिगरी यार’ राजीव धिंगरा या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. आत्तापर्यंत राजीवने ‘लव पंजाब’ आणि ‘अंग्रेज’ हे दोन हिट सिनेमे दिले आहेत.ALSO READ: का करायचे नाहीये कपिल शर्माला छोट्या पडद्यावर फिरंगीचे प्रमोशन?

नऊ बॅनरखाली साकारत असलेल्या या चित्रपटाचे ट्रेलर पाहण्यास तुम्ही उत्सूक असालच तर आणखी एक माहिती. चित्रपटाचे ट्रेलर येत्या २४ आॅक्टोबरला रिलीज होते आहे. या चित्रपटासाठी कपिलने बरेच काही गमावले आहे. या चित्रपटाच्या नादात कपिलच्या टेलिव्हिजनवरील लोकप्रीयतेला ओहोटी लागली. त्याचा अव्वल कॉमेडी शो बंद झाला. अनेकांची नाराजी त्याने ओढवून घेतली. तब्येतीच्या अनेक तक्रारी त्याच्या मागे लागल्या. आता या चित्रपटातून याची किती भरपाई होते, ते बघूच. तूर्तास तुम्ही चित्रपटाचे पोस्टर बघा आणि तुम्हाला ते कसे वाटले, तेही कळवा. ‘फिरंगी’ रिलीज झाल्यानंतर कपिल शर्मा पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परतणार असल्याची खबर आहे. त्यामुळे ‘फिरंगी’ रिलीजची प्रतीक्षा करू या आणि कपिलला शुभेच्छाही देऊ या!
Web Title: Do you see Kapil Sharma's 'Firangi' poster?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.