Do you know what happened to the clothes made by the hero and the heroine in the Bollywood film? | ​बॉलिवूडच्या चित्रपटात नायक-नायिकेने घातलेल्या कपड्यांचे काय होते तुम्हाला माहीत आहे का?

बॉलिवूडच्या चित्रपटातील नायक-नायिकांना सुंदर बनवण्यात त्यांच्या मेकअपमन इतकाच चित्रपटाच्या डिझायनरचा देखील हात असतो. प्रत्येक कलाकाराला त्याच्या व्यक्तिरेखेनुसार ते अतिशय सुंदर कपडे देतात. माधुरी दिक्षितचे हम आप के है कौनधील ड्रेस असो वा बाजीराव मस्तानी या चित्रपटातील दीपिका पादुकोणचा ड्रेस, की ये जवानी हे दिवानी या चित्रपटातील रणवीर कपूरची शेरवानी असो. त्यांच्या या कपड्यांवर आपण प्रचंड फिदा झालेलो होतो. त्यांच्यासारखे कपडे आपल्याला घालायला मिळावेत असे आपल्यालादेखील वाटत असते. अनेक चित्रपटातील व्यक्तिरेखांनी घातलेल्या कपड्यांची स्टाईल आपल्याला बाजारात पाहायला मिळते. पण नायक-नायिकेने घातलेल्या या कपड्यांचे चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर काय केले जाते याचा तुम्ही विचार केला आहे का? या कपड्यांचे काय केले जाते हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर अनेकवेळा ते कपडे प्रोडक्शन हाऊसच्या मोठमोठाल्या बॅगांमध्ये पडून राहातात. अनेकवेळा त्याचा वापर पुढील चित्रपटांमध्ये ज्युनिअर आर्टिस्टसाठी केला जातो. केवळ हे कपडे कोणत्या कलाकाराने याआधी चित्रपटात वापरले आहेत हे लोकांच्या लक्षात येऊ नये यासाठी त्याचे मिस मॅच केले जाते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ऐश्वर्या रायने कजरा रे कजरा रे या गाण्यात घातलेला ड्रेस नंतर बँड बाजा बरात या चित्रपटात एका ज्युनिअर आर्टिस्टने घातला होता. अशाप्रकारे अनेक ज्युनियर आर्टिस्टने आतापर्यंत प्रसिद्ध कलाकारांचे कपडे अनेक चित्रपटांमध्ये घातले आहेत. काही वेळा तर हे कपडे अनेक वर्षं तसेच्या तसे बॅगांमध्ये देखील पडून राहातात. लाखोच्या किंमतीचे हे कपडे पडून पडूनच अनेकवेळा खराब होतात.
एखाद्या कलाकाराला चित्रपटातील त्याचा ड्रेस आवडल्यास काही वेळा तो ड्रेस ते त्यांच्यासोबत देखील घेऊन जातात तर काही वेळा तो फॅशन डिझायनर ड्रेस आपल्यासोबत ठेवतो. 
एखाद्या कलाकाराचा ड्रेस खूपच प्रसिद्ध झाला असल्यास त्या ड्रेसचा लीलाव देखील करण्यात येतो आणि त्यातून येणारे पैसे चॅरिटीसाठी देण्यात येतात. सलमान खानने मुझसे शादी करोगी या चित्रपटातील जीने के है चार दिन या गाण्यात वापरलेला टॉवेल कित्येक लाख रुपये देऊन एका इसमाने विकत घेतला होता. 
Web Title: Do you know what happened to the clothes made by the hero and the heroine in the Bollywood film?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.