Do you know the 'these' things about Sunny Leone's husband Daniel Webber? | सनी लिओनीचा पती डेनियल वेबरविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?

अभिनेत्री सनी लिओनी बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर प्रसिद्ध पोर्न स्टार राहिली आहे. तिचा हा इतिहास जवळपास प्रत्येकजण जाणून आहे. मात्र, आज आम्ही सनी लिओनीचा पती डेनियल वेबरविषयी तुम्हाला काही माहिती सांगणार आहोत. आज सनी लिओनीचा वाढदिवस आहे. त्याचनिमित्त तिच्या जोडीदाराविषयीच्या अद्यापपर्यंत बाहेर न आलेल्या पैलूंबद्दलचा आढावा या वृत्तात घेणार आहोत. 

सनी लिओनीने परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान मिळविले आहे. मात्र अशातही सनी लिओनी आणि डेनियल यांच्या आयुष्यातील व्यक्तिगत बाबी फारच कमी लोकांना माहिती आहेत. लग्नाअगोदर डेनियल आणि सनीने एकमेकांना बरेच वर्ष डेट केले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा सनी डेनियलला एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये भेटली होती. ज्यामध्ये डेनियलने सनीला इम्प्रेस करण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु सनीने डेनियलला अजिबात भाव दिला नाही. तिच्यासाठी डेनियल केवळ एक केसोनोवा होता. हे जाणून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सनीने बॉलिवूड चित्रपटांमध्ये आतापर्यंत जेवढे हॉट सीन दिले आहेत, ते सर्व पती डेनियलसोबत दिले आहेत. डेनियल अशाप्रकारचे सीन देण्यासाठी चित्रपटात बॉडी डबलचे काम करीत असतो. डेनियल एखाद्या ड्रीम पतीप्रमाणे सनीला आपल्या हाताने जेवण बनवून भरवीत असतो. सनी लिओन आणि डेनियल वेबर केवळ चांगले लाइफ पार्टनर नाहीत तर चांगले बिझनेस पार्टनरही आहेत. सनीने पती डेनियलसोबत २००९ मध्ये सनलस्ट पिक्चर्स नावाचे एक प्रॉडक्शन हाउस सुरू केले आहे. सनीला डेनियलसोबत वेळ व्यतीत करायला खूप आवडते. त्यामुळे ती त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवू इच्छिते. जेव्हा-जेव्हा तिला कामातून वेळ मिळतो तेव्हा ती डेनियलसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करीत असते.
Web Title: Do you know the 'these' things about Sunny Leone's husband Daniel Webber?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.