अबोली कुलकर्णी

आयुष्यात संघर्ष करणं कुणाला चुकलंय? प्रत्येकाचे आयुष्य हे संघर्ष, झगडा, आव्हाने यांनी भरलेलं आहे. त्यातच तर खरी जगण्याची मजा असते. सगळं काही हातात मिळतंय म्हटल्यावर मग झगडा कुणाशी? आणि कशासाठी आपण करणार? बरं, आता हे सगळं जरी खरं असलं तरी त्याचा येथे काय संबंध? तर संबंध आहे. आज आपण बॉलिवूडच्या सर्वांत सक्सेसफुल बायोपिक्सचा आढावा घेणार आहोत. काही महान पर्सनॅलिटींवर चित्रपट बनवावा असे दिग्दर्शकाला वाटले, यातच त्यांच्या कार्याची महती दडलेली आहे. भाग मिल्खा भाग -१०९ कोटी
२०१३ मध्ये फरहान अख्तर याचा ‘भाग मिल्खा भाग’ हा बायोपिक चित्रपट रिलीज झाला. खेळ आणि देशभक्ती यांचा सुरेख मेळ त्याने अभिनयातून साकारला होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर खूप गल्ला जमवला. त्याने केलेला रेकॉर्ड नंतर सुशांतच्या ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ने मोडला.एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी-१२५ कोटींच्या पुढे 
सुशांतसिंग राजपूत याने महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय साकारला. याच चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर भरपूर गल्ला जमवला. पहिल्याच आठवडयात चित्रपटाने ६० कोटींची कमाई केली.

 द डर्टी पिक्चर - ८० कोटी
 सिल्क स्मिता हिच्या जीवनावर आधारित बायोपिक चित्रपटात विद्या बालन हिने उत्तम अभिनयाचे सादरीकरण केले. खरंतर रिअल लाइफ स्टोरीजना पडद्यावर फार काही प्रतिसाद मिळत नाही. मात्र, मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटाने ८० कोटींची कमाई केली. विद्याचा तर हा सर्वांत हिट चित्रपट म्हणून आपण ओळखतो.


 
नीरजा - ७५.६५ कोटी

 खुबसूरत चित्रपटात एकदम चुलबूल्या रूपात प्रेक्षकांसमोर आलेली सोनम कपूर हिने नीरजा मध्ये एकदम गंभीर अशी भूमिका साकारली. या चित्रपटामुळे तिची वाहवा, कौतुक झाले. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. 


 
मेरी कॉम - ६४ कोटी

 एक महिला बॉक्सर हिच्या आयुष्यावर चित्रपट होऊ शकतो? होय, एक पंजाबी मुलगी प्रियांका चोप्रा जेव्हा एका मनिपुरी युवतीची भूमिका साकारते तेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळतातच. ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात तिने मेरी कॉम हिच्या आयुष्याचा पडद्यावर आढावा घेतला होता. तिच्या भूमिकेवर लोकांनी  तुफान प्रेम केलं. चित्रपटातील गाणीही खूप हिट झाली.
Web Title: Do you know, 'these' sucessful biopics of Bollywood?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.