Do you know Shilpa Shetty's Fuerte Hotel in Shirdi? Watch video! | शिल्पा शेट्टीचे शिर्डीतील फेव्हरेट हॉटेल तुम्हाला माहिती आहे काय? पाहा व्हिडीओ!

अभिनेत्री शिल्पा शेट्टी रविवारी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आली होती. यावेळी शिल्पाने साईबाबांचे दर्शन घेल्यानंतर शिर्डीतीलच एका हॉटेलमध्ये साउथ इंडियन जेवणाचा आस्वाद घेतला. त्याचा एक व्हिडीओ शिल्पाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी दरवर्षी शिर्डीला जात असते. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मी या हॉटेलमधील वडा आणि शिरा या दोन पदार्थांचा न चुकता आस्वाद घेते. शिल्पाने सांगितल्यानुसार, ती गेल्या ३० वर्षांपासून शिर्डीला जात असून, या हॉटेलमधील पदार्थांचा आस्वाद घेतच असते. 


 

दरम्यान, व्हिडीओमध्ये शिल्पाने हॉटेल मालकाचाही परिचय करून दिला आहे. स्वामी नावाच्या या व्यक्तीबद्दल सांगताना शिल्पा म्हणते की, मी या व्यक्तीमुळेच गेल्या तीस वर्षांपासून सातत्याने या हॉटेलमध्ये येत आहे. यावेळी शिल्पाने वडा आणि शिरा या दोन पदार्थांचे भरपूर कौतुक केले. त्याचबरोबर या पदार्थांचा आस्वादही घेतला. दरम्यान, शिल्पा अखेरीस ‘सुपर डान्सर चॅप्टर-२’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत बघावयास मिळाली होती. 
Web Title: Do you know Shilpa Shetty's Fuerte Hotel in Shirdi? Watch video!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.