दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगसाठी शिकली स्वयंपाक करायला ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:24 PM2019-02-08T12:24:41+5:302019-02-08T12:39:19+5:30

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बी-टाऊनमधले हॉट आणि चर्चित कपल आहे. दीपवीरच्या मेंहदीपासून ते रिसेप्शनपर्यंत सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे.

Do you know that Deepika Padukone will make a dish for Ranveer Singh | दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगसाठी शिकली स्वयंपाक करायला ?

दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगसाठी शिकली स्वयंपाक करायला ?

ठळक मुद्देरणवीर सिंग त्याचा आगामी प्रोजेक्ट गल्ली बॉयच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेदीपिका व रणवीर यांच्या लग्नाला जवळपास ३ महिने पूर्ण होत आहेत

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बी-टाऊनमधले हॉट आणि चर्चित कपल आहे. दीपवीरच्या मेंहदीपासून ते रिसेप्शनपर्यंत सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सध्या रणवीर सिंग त्याचा आगामी प्रोजेक्ट गल्ली बॉयच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच दरम्यान रणवीर सिंगने दीपिकाला घेऊन एक नवा खुलासा केला आहे. रणवीरने सांगितले दीपिका त्याच्यासाठी काय जेवायला करते.  दीपिका त्याच्यासाठी रसम चावल ही साऊथची डीश बनवते हे सांगताना रणवीर लाजून हसायला लागला.    


रणवीर सिंगने दीपिकाच्या वाढदिवसाच्या दिवशी एक खास मॅसेज लिहिला होता. त्यात त्यांने लिहिले होते, ‘दीपिका एक अतिशय चांगली व्यक्ती आहे. ती माझी पत्नी आहे, म्हणून मी हे लिहित नाहीय. तिच्याबद्दल मला काय वाटते,हे व्यक्त करायला खरोखरचं माझ्याजवळ शब्द नाहीत. तरिही मी प्रयत्न करतो. या जगात मी तिच्या सर्वाधिक जवळ असणारा व्यक्ति आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही पातळीवर मी तिला ओळखतो. अस्सीम प्रेम, दया, बुद्धिमत्ता, सौंदर्य अशा सगळ्यांचा सुंदर समेट म्हणजे दीपिका. या सगळ्या गोष्टी तिला जगातील सर्वोत्तम अभिनेत्री बनवतात...'असे रणवीरने लिहिले आहे.  



दीपिका व रणवीर यांच्या लग्नाला जवळपास ३ महिने पूर्ण होत आहेत. गतवर्षी १४ व १५ नोव्हेंबरला या दोघांनी इटलीत लग्नगाठ बांधली होती. कोंकणी आणि सिंधी पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता.

Web Title: Do you know that Deepika Padukone will make a dish for Ranveer Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.