‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र आहे. चित्रपटगृहात येण्यापूर्वी हा चित्रपट लोकप्रीय झालायं आणि होणार का नाही, करिना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्करसारख्या तगड्या अभिनेत्री ज्या यात आहेत. करिना, सोनम व स्वरा यांच्याशिवाय आणखी एक अभिनेत्री या चित्रपटात दिसणार आहे, ती म्हणजे शिखा तलसानिया. करिना, सोनम आणि स्वरा यांच्या तुलनेत काहीशा गोलमटोल अर्थात कर्वी फिगरची शिखा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये शिखाने अनेक बोल्ड लूक दिले आहेत. कर्वी फिगर असतानाही चित्रपटात तिने सगळ्या प्रकारचे कपडे घातले आहेत. होय, अगदी बिकिनी सुद्धा.
आता ही शिखा आहे तरी कोण, हे जाणून घेऊ यात. फार कमी लोकांना ठाऊक असेल की, शिखा ही बॉलिवूडचा दिग्गज स्टार टीकू तलसानियाची मुलगी आहे. टीकू बॉलिवूडचा एक महान कॉमेडियन आहे. त्याच्या विनोदांनी प्रेक्षकांना अनेक वर्षे खळखळून हसवले आहे. या विनोदवीराची मुलगी म्हणजे शिखा.‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाआधी शिखा अनेक चित्रपटांत दिसलीयं. यातील आठवणीत राहणारा चित्रपट म्हणजे ‘वेक अप सिड’. या चित्रपटात तिने रणबीर कपूरच्या बेस्ट फ्रेन्डची भूमिका साकारली होती. ‘माय फ्रेन्ड पिन्टो’ आणि ‘मिडनाईट चिल्ड्रेन’ या चित्रपटातही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.


शिखाला लहानपणापासूनच अभिनयात रस होता. आपल्या वडिलांप्रमाणे तिला याच क्षेत्रात नाव कमवायचे होते. शिखाने अलीकडे एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. मी अभ्यासात फार हुशार नव्हते. प्रत्येक परिक्षेनंतर  कशीबशी पास झालेली पाहून इतर पालक मला हिणवायचे. असा निकाल आला तर काय झाले, तू तर वडिलांसारखी अभिनयचं करणार, असे मी अनेकदा ऐकले. त्यावेळी याचा कला काहीसा राग यायचा. आधी माझी आॅडिशन तर घ्याण मला अभिनय येतो की नाही, हे तर बघा, असे त्यावेळी मी मनातल्या मनात म्हणायचे, असे शिखाने या मुलाखतीत सांगितले होते.
  मला माझ्या सुंदर दिसण्यावर विचार करत बसण्यापेक्षा आणखी बरीच कामे आहेत, असेही ती म्हणाली होती.

Web Title: Do you know about Shikha Talasania, the actress of Veerre the Wedding?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.