"Do not you want to go ahead of China in terms of population?" Richa said in response to the ban on the promotion of condom advertising. | कंडोम जाहिरातीच्या प्रसारण बंदीवर रिचा चढ्ढाने म्हटले, ‘लोकसंख्येच्या बाबतीत आपल्याला चीनच्या पुढे जायचे की नाही?’

अ‍ॅडव्हरटायझिंग स्टॅण्डर्स काउन्सिल आॅफ इंडियाने नुकतेच कंडोम या प्रॉडक्टच्या जाहिराती रात्री १० नंतर प्रसारित केल्या जाव्यात असे स्पष्ट केले. अभिनेत्री सनी लिओनी हिच्या कंडोमच्या जाहिरातीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र एएससीआयचा हा निर्णय अभिनेत्री रिचा चढ्ढा हिला फारसा पसंत आला नसावा असेच दिसत आहे. ‘फुकरे’मध्ये भोली पंजाबनची भूमिका साकारणाºया रिचाचा एक व्हिडीओ इंटरनेटवर समोर आला आहे. द क्वीण्ट या यू-ट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या १ मिनिट ३३ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये रिचा सांगत आहे की, ‘आपण जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुसºया क्रमांकावर आहोत, तर आपल्यापुढे म्हणजेच पहिल्या क्रमांकावर चीन आहे. मग तुम्हीच सांगा आपल्याला चीनच्या पुढे जायचे आहे की नाही?’

व्हिडीओमध्ये रिचा तिच्या ‘फुकरे’ या चित्रपटातील चूचा या पात्राचा उल्लेख करताना म्हणते की, जर चूचासारखे ५० हजार लोक रस्त्यावर फिरत असतील तर काय बिघडले? त्यांचा सांभाळ करायला त्यांचे आई-वडील आहेत ना. पुढे बोलताना रिचा म्हणतेय की, तुम्ही कधी मेडिकल स्टोअरवर एखाद्या मुलाला कंडोम खरेदी करताना बघितले काय? सॅनिटरी पॅड खरेदी करणाºया मुलीपेक्षाही कंडोम खरेदी करणारा धास्तावलेला असतो. ही भीती आणि मनातील अस्वस्थता दूर करण्यासाठीच ही जाहिरात बंद करण्यात आली आहे. एकूणच दीड मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये भोली पंजाबन कंडोमच्या जाहिरातीवर आणलेल्या बॅनवर काहीशी तिखट प्रतिक्रिया देताना दिसून आली. दरम्यान, अ‍ॅडव्हरटायझिंग स्टॅण्डर्स काउन्सिल आॅफ इंडियाच्या या निर्णयानंतर कंडोम प्रॉडक्टच्या जाहिराती रात्री १० ते सकाळी ६ वाजेदरम्यान प्रसारित केल्या जाणार आहेत. वास्तविक कंडोमच्या जाहिरातीविरोधात आतापर्यंत बºयाचशा तक्रारी समोर आल्या आहेत. याअगोदरही कंडोमच्या जाहिराती बंद केल्या जाव्यात अशी मागणी करण्यात आली होती. आता या जाहिराती रात्री १० नंतरच प्रसारित केल्या जात आहेत. 
Web Title: "Do not you want to go ahead of China in terms of population?" Richa said in response to the ban on the promotion of condom advertising.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.