Do not seek political intervention in the army - Nimrat Kaur | लष्करात राजकीय हस्तक्षेप नको - निमरत कौर

‘द टेस्ट केस’ची अभिनेत्री निमरत कौर हिने म्हटले की, भारतीय लष्करात राजकीय हस्तक्षेप असायला नको. निमरत ‘द टेस्ट केस’ या वेबसिरीजमध्ये एका सैनिकाची भूमिका साकारत आहे. तिच्या वडिलांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. तिच्या मते, आईने मला नेहमीच मुस्लीमविरोधी वातावरणापासून दूर ठेवले. तसेच माझ्यात उदारमतवादी विचार विकसित होऊ दिले. मात्र आज देशात जे वातावरण निर्माण झाले आहे, त्यावरून तरुण पिढींचे विचार उदारमतवादी नव्हे तर संकुचित  होताना दिसत आहेत. मिरर नाउ या टीव्ही चॅनेलवरील एका कार्यक्रमात निमरतने गेल्या आठवड्यात जम्मूमध्ये झालेल्या सैनिकांच्या शिबिरावरील दहशतवादी हल्ल्याबद्दल म्हटले की, ‘मला असे वाटते की, राजकारण हे आपल्या कार्यक्षेत्रातच करायला हवे. सैन्यामध्ये उगाचच हस्तक्षेप करू नये. 

‘द लंचबॉक्स’ची अभिनेत्री असलेल्या निमरतने म्हटले की, ‘मला माहिती आहे की, माझ्या वडिलांची हत्या मुस्लीम दहशतवाद्यांनी केली. मला तर बºयाचदा असे सांगण्यात आले की, मुसलमान असेच असतात, त्यांच्या धर्मातच हिंसा आहे. ते लोकांची हत्या करतात. यासह अनेक नकारात्मक विचार माझ्यावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्या आईने मला नेहमीच यापासून दूर ठेवले आहे. कारण तिला मला एका उदारमतवादी विचार ठेवणाºया देशाची एक नागरिक म्हणून समोर आणायचे होते. निमरत निर्माता एकता कपूरसोबत ‘द टाउन हॉल’ या टॉक शोमध्ये सहभागी झाली होती. हा शो पत्रकार बरखा दत्तने होस्ट केला. यावेळी निमरतने तिचे बालपण कसे व्यतित झाले याविषयी सांगितले. त्याचबरोबर तिच्यावर सकारात्मक विचारांचा कसा पगडा आहे, हेदेखील त्याने आवर्जून अधोरेखित केले. तसेच देशातील सद्य:स्थितीबद्दल चिंताही व्यक्त केली. 
Web Title: Do not seek political intervention in the army - Nimrat Kaur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.