कंगना राणौत सध्या बिकानेरमध्ये ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या आपल्या आगामी चित्रपटात बिझी आहे. याच चित्रपटाच्या सेटवरचे कंगनाचे नवे लूक समोर आले आहे. यात कंगनाचा रॉयल अंदाज वेड लावणारा आहे. यात कंगना वाइन रेड कलरच्या महाराष्ट्रीय पोशाखात दिसतेय. यापूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे कंगनाचे बरेचसे फोटो लीक झाले आहेत. चर्चा खरी मानाल तर, कंगनानेचं हे फोटो जाणीवपूर्वक लीक केले होते. होय, म्हणजे चर्चा तरी तीच होती.

‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’तील आपला लूक लीक व्हावा, अशी खुद्द कंगनाची इच्छा होती, अशी चर्चा त्यावेळी पसरली होती. याला कारण होते, दीपिका पादुकोण.  दीपिकाचा ‘पद्मावत’मधील लूक आणि ‘घूमर’ हे गाणे सोशल मीडियावर तुफान गाजत होते. शिवाय  दीपिकाच्या राणी पद्मावतीमधील लूकची जोरदार प्रशंसा सुरू होती. दीपिकाच्या या प्रशंसेनंतर असुरक्षिततेच्या भावनेतून कंगनाने म्हणे, जाणीवपूर्वक ‘मणिकर्णिका’च्या सेटवरचे फोटो लीक केले होते.  कदाचित ‘हम भी कुछ कम नहीं’ हे कंगनाला सिद्ध करायचे होते. आता यात किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही.  पण एक गोष्ट मात्र आम्ही दाव्यानिशी सांगू शकतो. ती म्हणजे, राणी लक्ष्मीबाईच्या लूकमध्ये कंगना कमालीची जमून आलीयं. कदाचित याबाबत तुमचेही दुमत नसावे.ALSO READ : बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल कंगना राणौत चित्रपट सोडून राजकारणात घेणार एन्ट्री?

 हा चित्रपट झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारख्या चित्रपटांची कथा लिहिणारे विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत.यात  झलकारी बाईच्या भूमिकेत अंकिता लोखंडे दिसणार आहे. तर अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत आहे. वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे.  पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती.  तूर्तास कंगनाचे फॅन्स या चित्रपटाची वाट मोठ्या आतुरतेने बघतायेत. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट आलेली नाही.
Web Title: Do not miss: Have you seen this Kangna of Manikarnika set?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.