Do not go abroad! Priyanka Chopra's mother, Madhu Chopra, talks on Lekhi's relationship news! | विदेशी जावई नकोच! लेकीच्या रिलेशनशिपच्या बातम्यांवर बोलली प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा!

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या एका ‘परदेसी बाबू’च्या प्रेमात पडल्याची चर्चा आहे. सध्या प्रियांका्च्या या कथित रिलेशनशिपच्या बातम्या चवीने चघळल्या जात आहेत. स्वत:पेक्षा १० वर्षे लहान अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत प्रियांका रिलेशनशिपमध्ये असल्याचे मानले जात आहे. युएस डेलीने दिलेल्या बातमीनुसार, दोघेही सीरिअस रिलेशनशिपमध्ये आहेत आणि एकमेकांना डेट करताहेत. या दोघांच्याही एका जवळच्या कॉमन फ्रेन्डच्या हवाल्याने युएस डेलीने हे वृत्त दिले आहे. दोघेही एकमेकांत प्रचंड इंटरेस्टेड आहेत असेही या वृत्तात म्हटले गेले आहे. निक सध्या २५ वर्षांचा आहे तर प्रियांकाने पस्तिशी ओलांडलीय.  अगदी अलीकडे प्रियांका निकसोबत सुप्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर दिसली होती. त्यांचा येथील एक व्हिडिओ एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लीक झाला होता. यानंतर प्रियांका व निक एका बोट पार्टीतही दिसले होते.त्यांचा तेथील वावर बरेच काही सांगणारा होता. पण प्रियांकाची आई मधू चोप्रा यांना विचाराल तर त्यांनी या सगळ्या अफवा ठरवल्या आहेत. मी कुण्या विदेशीसोबत प्रियांकाच्या लग्नाची कल्पनाही करू शकत नाही. या सगळ्या अफवा आहेत. मीडिया काहीही लिहितो, असे त्यांनी म्हटले आहे. आता मधू यांच्या म्हणण्यानुसार, खरेच ही अफवा आहे की, मधू स्वत:चं मुलीच्या या रिलेशनशिपबाबत अंधारात आहेत, हे लवकरचं कळेल.२०१७ मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका व निक सोबत दिसले होते. निकची ‘डेट’ बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती. आत्तापर्यंत प्रियांका निकसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्या नाकारत आली आहे. पण सध्या दोघांचे सोशल मीडियावरचे व्हिडिओ आणि फोटो बघता, दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चेचा बाजार गरम आहे. निक हा अमेरिकन गायक आणि अभिनेता आहे. ८-९ वर्षांचा होता तेव्हापासून निक अभिनय करतोय. यादरम्यान अनेक नाटकांत त्याने अभिनय केला. २००२ मध्ये निकने वडिलांसोबत मिळूल  जॉय टू द वर्ल्ड नावाचे एक गाणे लिहिले आणि अशाप्रकारे निकने अभिनयाशिवाय संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले. निकचे वडीलही एक गीतकार, गायक आणि रंगभूमी कलाकार होते. आई साईन लँग्वेजची टीचर होती़ सोबतच गायिका होती. वारसा निकला घरातूनचं मिळाला होता. २००५मध्ये निकले पॉल केविन जोनास आणि जोसेफ एडम जोनास या दोन भावांसोबत जोनास ब्रदर्स नावाचा पॉप रॉक बँड बनवला. जोनास ब्रदर्सने चार अल्बम रिलीज केले आहेत.

ALSO READ : प्रियांका चोप्रा खरचं पडलीयं का अमेरिकन गायकाच्या प्रेमात? कोण आहे हा निक जोनास??
Web Title: Do not go abroad! Priyanka Chopra's mother, Madhu Chopra, talks on Lekhi's relationship news!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.