टायगर श्रॉफ व दिशा पटानीच्या ‘व्हॅलेन्टाईन डे’ पोस्टने चाहत्यांना केले कन्फ्युज...पाहा व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 10:22 AM2019-02-15T10:22:46+5:302019-02-15T10:26:39+5:30

 काल व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर टायगर व दिशा यांनी सगळ्यांनाच धक्का दिला. धक्क्यापेक्षा सगळ्यांना गोंधळात टाकले. 

disha patani and tiger shroffs valentines day posts sent the internet into meltdown | टायगर श्रॉफ व दिशा पटानीच्या ‘व्हॅलेन्टाईन डे’ पोस्टने चाहत्यांना केले कन्फ्युज...पाहा व्हिडिओ!!

टायगर श्रॉफ व दिशा पटानीच्या ‘व्हॅलेन्टाईन डे’ पोस्टने चाहत्यांना केले कन्फ्युज...पाहा व्हिडिओ!!

googlenewsNext
ठळक मुद्देटायगर व दिशा दीर्घकाळापासून एकमेकांसोबत आहेत. दोघेही अनेकदा लंच व डिनर डेट एन्जॉय करताना दिसतात. एकत्र सुट्टीही घालवतात. पण नात्यावर बोलायला ते अद्यापही तयार नाहीत.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी यांच्या नात्याची चर्चा दीर्घकाळापासून आहे. दीर्घकाळापासून टायगर व दिशा रिलेशनशिपमध्ये असल्याचे मानले जात होते. पण टायगर वा दिशा यांनी यावर चुप्पी साधली होती. दोघेही एकमेकांसोबत खुल्लमखुल्ला फिरत असले तरी आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलायला मात्र ते तयार नव्हते. पण  काल व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर टायगर व दिशा यांनी सगळ्यांनाच धक्का दिला. धक्क्यापेक्षा सगळ्यांना गोंधळात टाकले. 


होय, टायगर व दिशा दोघांनीही सोशल मीडियावर आपआपले फोटो शेअर केलेत आणि हे फोटो पाहून अनेक जण कन्फ्युज झालेत. या फोटोंत दिशा आणि टायगर दोघेही आपल्या बोटातील हिºयाच्या अंगठीचे चुंबन घेताना दिसले. कुणीतरी मला विचारले आणि मी होकार दिला, असे कॅप्शन दिशाने या फोटोला दिले. यानंतर टायगरनेही असाच एक फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला.

या फोटोनंतर दोघांनीही एन्गेजमेंट केल्याचे मानले गेले. पण  दोघांनीही अंगठी एन्गेजमेंट फिंगरऐवजी तर्जनीत घातलेली दिसली आणि चाहते गोंधळात पडले. अखेर टायगर व दिशा या दोघांनीचं या रहस्यावरून पडदा उठवला. होय, हे पोस्ट केलेले फोटो दुसरे तिसरे काही नसून एका जाहिरातीचा भाग असल्याचा खुलासा त्यांनी केला. दोघांनीही त्या जाहिरातीची एक झलक आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केली. ज्यात या अंगठ्यांचा वापर केलेला आहे. एकंदर काय तर आम्ही एन्गेजमेंट केलेली नसून शेअर केलेले फोटो एका प्रमोशनल कॅम्पेनचा भाग होता, हे त्यांनी सांगितले. 


टायगर व दिशा दीर्घकाळापासून एकमेकांसोबत आहेत. दोघेही अनेकदा लंच व डिनर डेट एन्जॉय करताना दिसतात. एकत्र सुट्टीही घालवतात. पण नात्यावर बोलायला ते अद्यापही तयार नाहीत. कदाचित ती वेळ अजून यायचीय, असेच म्हणायला हवे. सध्या टायगर ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तो अनन्या पांडे व तारा सुतारियासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय त्याने ‘बागी 3’चीही घोषणा केलीय. मार्च २०२० मध्ये ‘बागी 3’ प्रदर्शित होतोय. 

Web Title: disha patani and tiger shroffs valentines day posts sent the internet into meltdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.