Birthday Special: दिशा पटानीसोबतच आज आहे तिच्या एका जवळच्या मित्राचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 12:47 PM2019-06-13T12:47:02+5:302019-06-13T12:48:18+5:30

दिशा पटानीचा आज वाढदिवस असून तिने खूप कमी वर्षांत खूप चांगले फॅन फॉलोव्हिंग मिळवले आहे.

Disha Patani and Aditya Thackeray Has Birthday On 13th June | Birthday Special: दिशा पटानीसोबतच आज आहे तिच्या एका जवळच्या मित्राचा वाढदिवस

Birthday Special: दिशा पटानीसोबतच आज आहे तिच्या एका जवळच्या मित्राचा वाढदिवस

googlenewsNext
ठळक मुद्देदिशासोबतच आज तिच्या एका खास मित्राचा वाढदिवस आहे. शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस असून दिशा आणि त्यांची खूपच चांगली मैत्री आहे. 

'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दिशा पटानीचा आज वाढदिवस आहे. दिशाने खूप कमी वर्षांत खूप चांगले फॅन फॉलोव्हिंग मिळवले आहे. दिशा तिच्या अभिनयासोबतच तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशासोबतच आज तिच्या एका खास मित्राचा वाढदिवस आहे. शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस असून दिशा आणि त्यांची खूपच चांगली मैत्री आहे.

 

धोनी या चित्रपटातील दिशाच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती आणि त्यानंतर जॅकी चॅनसह 'कूंग फू योगा' या सिनेमातही दिशाने काम केलं होतं. 'बागी-२' या सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळाली होती. 'बागी-२' मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना प्रचंड भावली होती. 

आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांना काही दिवसांपूर्वी एका हॉटेलच्या बाहेर पाहाण्यात आले होते. याआधी देखील काही महिन्यांपूर्वी ते दोघे एकत्र दिसले होते. दिशा आणि आदित्य यांना एकत्र पाहाताच त्यांच्या मैत्रीची चर्चा रंगली होती. तसेच त्यांच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिशाला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले होते. ‘टायगर जिंदा है’ असं एका नेटिझनने कमेंटमध्ये म्हटले होते तर काहींनी ‘टायगर कहाँ है’, असा प्रश्न दिशाला विचारला होता तर ‘अब टायगर का क्या होगा, ‘अब फिर एक बार टाइगर के पैर में चोट लगने वाली है,’ असं म्हणत दिशाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. या सगळ्यावर नुकतेच दिशाने उत्तर दिले असून तिने म्हटले आहे की, आपण आपल्या एखाद्या मित्रासोबत जेवायला बाहेर जाऊ शकत नाही का? मी केवळ मुलींसोबतच मैत्री करते असे नाहीये. अनेक मुलं देखील माझे चांगले फ्रेंड्स आहेत.

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून ऐकायला मिळत आहे. दिशा आणि टायगर कधी लंच डेटवर जातात तर कधी पार्टींमध्ये एकत्र दिसतात. दिशाच्या भारत या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या प्रिमियरला देखील टायगर आणि दिशा एकत्र दिसले होते. पण दिशाने नेहमीच त्यांच्या नात्याबाबत मौन राखणेच पसंत केले आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान टायगरने त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, सेलिब्रेटींच्या आयुष्याची चर्चा नेहमीच सगळीकडे सुरू असते. त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची इच्छा सगळ्यांना असते हे मला माहिती आहे. त्यामुळे दिशा आणि माझ्याकडे लोकांचे जास्तच लक्ष असते. आम्ही दोघे एकत्र खूप धमाल मस्ती करतो आणि एकमेकांची कंपनी एन्जॉय करतो. त्यामुळे या सगळ्या चर्चांचा आमच्या मैत्रीवर कधीही परिणाम होत नाही. 

Web Title: Disha Patani and Aditya Thackeray Has Birthday On 13th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.