वरूण धवनच्या या ‘१०० करोडी’ चित्रपटासाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 11:53 AM2019-05-30T11:53:54+5:302019-05-30T11:54:02+5:30

बॉलिवूडच्या नव्या पिढीचा सर्वाधिक यशस्वी अभिनेता वरूण धवन याने काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे नाव तर ठरले नव्हते. पण दिग्दर्शक शशांक खेतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार होता.

director shashank khaitans action thriller with varun dhawan is pushed ahead | वरूण धवनच्या या ‘१०० करोडी’ चित्रपटासाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा, हे आहे कारण

वरूण धवनच्या या ‘१०० करोडी’ चित्रपटासाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा, हे आहे कारण

googlenewsNext
ठळक मुद्देशशांक खेतान ‘मिशन इम्पॉसिबल’ या हॉलिवूड चित्रपटाच्या धर्तीवर हा चित्रपट बनवू इच्छितो. त्यामुळे त्याला थोडा वेळ लागतोय.

बॉलिवूडच्या नव्या पिढीचा सर्वाधिक यशस्वी अभिनेता वरूण धवन याने काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे नाव तर ठरले नव्हते. पण दिग्दर्शक शशांक खेतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार होता. अ‍ॅक्शन थ्रीलर अशा या चित्रपटात वरूणची जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार होती. पण तूर्तास तरी असे होणे नाही. होय, याचे कारण म्हणजे, वरूणचा हा चित्रपट सध्या तरी लांबणीवर पडला आहे.
ताजी चर्चा खरी मानाल तर वरूण धवन व शशांक खेतान या दोघांनी हा चित्रपट तूर्तास फ्लोरवर न आणण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाबद्दलची शशांकची कल्पना एकदम भन्नाट होती. पण ही कल्पना स्क्रिप्टमध्ये पूर्णपणे उतरू शकली नाही. शशांक ही कल्पना कागदावर उतरवण्यात कमी पडला. त्यामुळे हा चित्रपट सध्या न बनवण्याचा निर्णय त्याने घेतला.


डेक्कन क्रॉनिकलशी बोलताना खुद्द शशांकनेही या वृत्ताला दुजोरा दिला. सध्या आम्ही हा चित्रपट होल्डवर ठेवला आहे. कारण प्री-प्रॉडक्शनसाठी आम्ही आणखी थोडा वेळ देऊ इच्छितो. मी याच्या स्क्रिप्टवर लवकरच काम सुरु करणार. ही स्क्रिप्ट प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार बनेल, याचा मी प्रयत्न करणार. स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर बजेट मिळताच मी याचे शूटींग सुरु करेल, असे शशांकने सांगितले.


शशांक खेतान ‘मिशन इम्पॉसिबल’ या हॉलिवूड चित्रपटाच्या धर्तीवर हा चित्रपट बनवू इच्छितो. त्यामुळे त्याला थोडा वेळ लागतोय. निश्चितपणे अशा चित्रपटांसाठी जबरदस्त प्लानिंग करावी लागते. जेणेकरून शूटींगमध्ये कुठलीही अडचण येऊ नये. त्यामुळे शशांकच्या या चित्रपटासाठी आपल्याला आणखी काही प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: director shashank khaitans action thriller with varun dhawan is pushed ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.