Director Satish Kaushik asks why Boney Kapoor apologizes after 25 years? | ​दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी २५ वर्षांनंतर का मागितली बोनी कपूर यांची माफी?

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी आपल्या करिअरची सुरूवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. शेखर कपूर दिग्दर्शित ‘मासूम’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. सोबतच यात अभिनयही केला होता. अनिल कपूर आणि श्रीदेवी स्टारर ‘रूप की रानी चोरो का राजा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शक क्षेत्रात पाऊल ठेवले होते. पण त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट सुपर फ्लॉप ठरला होता. १६ एप्रिल १९९३ रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. ‘रूप की रानी चोरो का राजा’चे निर्माता होते बोनी कपूर. बोनी कपूर यांनी मोठ्या विश्वासाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश कौशिक यांच्या खांद्यावर टाकली होती. पण चित्रपट आपटला. ना या बडी स्टार कास्ट कामी आली, ना सतीश कौशिक यांचे दिग्दर्शन. याचे शल्य सतीश कौशिक यांच्या मनात कुठेतरी असावे. काल या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झालीत आणि यानिमित्ताने सतीश कौशिक यांनी आपले मन मोकळे करत, बोनी कपूर यांची माफी मागितली.‘२५ वर्षांपूर्वी बोनी कपूर यांनी मला ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पहिला ब्रेक दिला होता. हा चित्रपट माझ्यासाठी माझ्या मुलासारखा होता. पण हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर दणकून आपटला. श्रीदेवींचे स्मरण करत, यासाठी मी बोनी कपूर यांची माफी मागू इच्छितो,’असे सतीश कौशिक यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर लिहिले.

ALSO READ : ​६१ वर्षांच्या या अभिनेत्याने कमी केले २५ किलो वजन, एकाचवेळी साईन केलेत सहा सिनेमे!

या चित्रपटात अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ लीड रोलमध्ये होते. दोन एकमेकांपासून ताटातूट झालेल्या भावांची कथा यात दाखवण्यात आली होती. पित्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हे दोन्ही भाऊ जीवाचे रान करतात, असे याचे कथानक होते. श्रीदेवी यात फिमेल लीडमध्ये होत्या.
Web Title: Director Satish Kaushik asks why Boney Kapoor apologizes after 25 years?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.