Dilje Dilshan extracted for all 3 Bollywood movies! | दिया मिर्झाने काढला बॉलिवूडच्या तिन्ही खानांना चिमटा!!
दिया मिर्झाने काढला बॉलिवूडच्या तिन्ही खानांना चिमटा!!
अभिनेत्री दिया मिर्झा हिने वयाचा एक विशिष्ट टप्पा गाठला आहे आणि यामुळे तिला बॉलिवूडमध्ये काम मिळणे कठीण झाले आहे. हे आम्ही नाही तर खुद्द दियानेचं बोलून दाखवले आहे. अलीकडे एका ताज्या मुलाखतीत दियाने याबद्दलची खंत बोलून दाखवली. वयाच्या एका टप्प्यावर पोहोचताच अभिनेत्रींसाठी संधीची कवाडे हळूहळू बंद व्हायला लागतात, असे ती म्हणाली.
ती म्हणाली की, बॉलिवूड इंडस्ट्री तिशी ओलांडलेल्या अभिनेत्रींसाठी पाहिजे इतकी सहज नाहीच. कारण  निर्मात्यांना तिशी ओलांडलेल्या अभिनेत्रींना आपल्या चित्रपटात घेण्यात काहीही रस नाही. इतकेच काय, पन्नाशी ओलांडलेल्या हिरोंनाही त्यांच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या हिरोईनसोबत काम करण्यातचं अधिक रस आहे. त्यामुळेच विशेषत: तिशी ओलांडलेल्या अभिनेत्रींसाठींच्या संधी घटू लागल्या आहेत. मी पण यातून गेले आहे. मी चित्रपटांत काम करण्यासाठी उत्सूक होते. कारण चित्रपटांत काम न करणे, भयावह होते. काही भूमिका आल्याही. पण मी मला त्या आवडल्या नाही. मी त्या भूमिकांची प्रतीक्षा केली, ज्या मला हव्या होत्या. इराणी चित्रपट पूर्ण केल्यानंतर एखाद्या विश्वसनीय निर्मात्यासोबत काम करण्यासाठी मी अडीच वर्षे प्रतीक्षा केली. २०१६ मध्ये मला ‘संजू’ साठी राजकुमार हिरानी यांचा फोन आला. ही भूमिका मला हवी तशी होती आणि मी ती स्वीकारली, असेही तिने सांगितले.

ALSO READ : दोन वर्षांनंतर सेटवर गेल्यावर दिया मिर्झाची 'ही' होती प्रतिक्रिया

 ‘संजू’ आगामी चित्रपटात अभिनेत्री दिया मिर्झा संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तची भूमिका साकारणार आहे. 
दियाने आपल्या करिअरची सुरुवात 2001 मध्ये आलेल्या ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटातून केली होती. चांगली सुरुवात होऊन ही तिला हवं तसं यश मिळवता आले नाही. अभिनयाशिवाय दियाने पत्नी साहिल सिंघासह एक ‘बॉर्न फ्री एंटरटेनमेंट’ या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती केली. ‘बॉबी जासूस’ हा चित्रपट त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट होता.     
Web Title: Dilje Dilshan extracted for all 3 Bollywood movies!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.