'A Dil' V / S 'Addition' war in the war! | ​ ‘ऐ दिल’ V/S ‘शिवाय’च्या युद्धात ‘दंगल’ची उडी!

या दिवाळीत बॉक्सआॅफिसवर घमासान पाहायला मिळणार आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ विरूद्ध ‘शिवाय’ असा संघर्ष बॉक्सआॅफिसवर रंगणार आहे. या युद्धात आता आमीर खानही उडी घेणार आहे. होय, आमीरचा बहुप्रतिक्षीत ‘दंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर अगदी दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी रिलीज होणार आहे. म्हणजेच, ‘ऐ दिल...’ आणि ‘शिवाय’सोबत चित्रपटगृहांमध्यो‘दंगल’चा ट्रेलर प्रेक्षकांना पाहता येऊ शकेल. हा आमीरच्या मार्केटींग रणनीतिचा भाग आहे. कारण याचवेळी शाहरूख खानच्या ‘डिअर जिंदगी’चा ट्रेलरही रिलीज होणार आहे. एकंदर काय  तर करण जोहर आणि अजय देवगणच्या दोन चित्रपटांमध्ये आमीर आणि शाहरूख यांच्या चित्रपटांच्या ट्रेलरमध्ये नवा संघर्ष होताना दिसणार आहे. आता यात कोण सरस ठरतं, ते लवकरच दिसेल.


Web Title: 'A Dil' V / S 'Addition' war in the war!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.