Did you see this strange video of Virat-Anushka? | विराट-अनुष्काचा हा अनसीन व्हिडीओ तुम्ही बघितला काय?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबर २०१७ रोजी इटली येथे लग्न केले. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शनही दिले. ज्यामध्ये बॉलिवूडसह सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील सेलिब्रिटी उपस्थित होते. अनेकांनी विरूष्काची रिसेप्शन पार्टी एन्जॉय करताना मनसोक्त डान्स केला. यांच्यासोबत नवदाम्पत्य विरूष्कानेही ठुमके लावले. त्यातीलच एक अनसीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

विरूष्काने लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चांगलाच एन्जॉय केला होता. दोघांनी आपल्या मित्रांसोबत जबरदस्त डान्स करताना सगळ्यांचीच मने जिंकली होती. आता त्यातीलच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघेही ‘मेरे रेश्के कमर...’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना बघावयास मिळत आहेत. 
 

विराट आणि अनुष्काचे वेडिंग कपडे सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केले होते. लग्नात विराटने पांढºया रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर अनुष्काने लाइट पिंक कलरचा लहेंगा परिधान केला होता. लग्नानंतर दोघेही दक्षिण आफ्रिकेला हनिमूनसाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर दोघेही लगेचच कामावर परतले. विराट दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत व्यस्त झाला तर अनुष्का तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली. 
Web Title: Did you see this strange video of Virat-Anushka?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.