Did you see Siddharth Malhotra and Parineeti Chopra's 'Jabaria Jodi'? | सिद्धार्थ मल्होत्रा व परिणीती चोप्रा यांच्या 'जबरिया जोडी'ची झलक पाहिलीत का?
सिद्धार्थ मल्होत्रा व परिणीती चोप्रा यांच्या 'जबरिया जोडी'ची झलक पाहिलीत का?

ठळक मुद्देबिहारमधील पकडूआ शादी' ह्या प्रथेवर आधारित जबरिया जोडी सिद्धार्थ आणि परिणीती चोप्रा यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा स्क्रीनवर

अभिनेत्री परिणीती चोप्रा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे. 'जबरिया जोडी'मध्ये हे दोघे एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. नुकतीच या चित्रपटाची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली. सिद्धार्थ मल्होत्राने या चित्रपटातील झलक इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
 
 'जबरिया जोडी'च्या झलकवरूनच हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असल्याचे लक्षात येत आहे. परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाची निर्माती एकता कपूरने केली आहे. 

आधी या सिनेमाचे नाव शॉटगन शादी असे ठेवण्यात येणार होते मात्र नंतर काही तरी बदल झाल्याने सिनेमाचे नाव जबरिया जोडी ठेवण्यात आले. फर्स्ट लूकमध्ये सिनेमाची थीम स्पष्ट होतेय. हा सिनेमा बिहारमध्ये सध्या चालत असलेल्या बळजबरी विवाह करून देण्याच्या म्हणजेच 'पकडूआ शादी' ह्या प्रथेवर आधारित आहे. ह्या सिनेमासाठी एकताने सिद्धार्थला बॉडी बनवण्याचा सल्ला दिला आहे. या भूमिकेसाठी परिणीतीच्या आधी श्रद्धा कपूरला अप्रोच करण्यात आले होते. मात्र तिने नकार दिला.  
सिद्धार्थ आणि परिणीती याआधीही 'हसी तो फसी' चित्रपटातून एकत्र झळकले आहेत. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसादही मिळाला होता. आता या चित्रपटातूनही दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. प्रशांत सिंगद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी १७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  
 


Web Title: Did you see Siddharth Malhotra and Parineeti Chopra's 'Jabaria Jodi'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.