Did you see a new poster of 'Bareli Ki Barfi'? | 'बरेली की बर्फी’चे नवे पोस्टर तुम्ही पाहिलेत का ?

क्रिती सॅनन, आयुषमान खुराना आणि राजकुमार रावचा आगामी चित्रपट बरेली की बर्फीचे नाव पोस्टर आऊट झाले आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधी हा चित्रपट 21 जुलैला रिलीज होणार होता मात्र काही कारणांमुळे त्याची रिलीज टेड पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी करते आहे. रिलीज झालेल्या पोस्टरच्या बॅकगाऊंडमध्ये बरेली स्टेशनचे बोर्ड लागलेले दिसते आहे. क्रिती पोस्टरमध्ये बिंदास अंदाजता बसलेली दिसते आहे. तर चित्रपटामधले हिरो तिच्या मागे उभे राहिलेले दिसतायेत. तिघांच्या डोळ्यावर काळा चष्मा लावला दिसतो आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने ट्वीटवर हे पोस्टर शेअर केले आहे. बरेली की बर्फीमध्ये क्रिती बिट्टी नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. बिट्टीला ब्रेक डान्स करायला खूप आवडतो तसेच इंग्रजी चित्रपट पाहण्याचा छंद तिला आहे. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.     



चित्रपटाची कथा युपीतल्या बरेली शहरात घडते. चित्रपटाची कथा बिट्टीच्या लग्नाभवती फिरते. राजकुमार आणि आयुषमानला बिट्टीशी लग्न करायचे असते. याकारणामुळे दोघांमध्ये टक्कर दिसते. त्यांच्यातील चढाओढ पाहणे मजेदार ठरणार आहे. शेवटी कोण क्रितीचे मनं जिंकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याशिवाय आयुषमानची शुभ मंगल सावधान चित्रपटही रिलीजसाठी तयार आहे. यात आयुषमान आणि भूमी पेडणेकरची जोडी पाहायला मिळणार आहे.  
Web Title: Did you see a new poster of 'Bareli Ki Barfi'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.