Did the two detectives get help for 'Twilight 2' movie? Know what happened | 'जुडवा 2' सिनेमासाठी दोन गुप्तहेरांची घ्यावी लागली मदत?जाणून घ्या काय घडले होते

'जुडवा 2' सिनेमाच्या प्रमोशनसाठी तापसी पन्नू,जॅकलिन फर्नाडिस आणि वरूण धवन सिनेमाच्या सेटवर  शूटिंग करत असताना विश्रामपुर येथील प्रसिध्द गुप्तहेर एजन्सीतील दोन गुप्तहेर त्या ठिकाणी फिरताना दिसल्याची  माहिती मिळतेय.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तापसी आणि जॅलकलिनच्या मदतीसाठी या गुप्तहेरांना सेटवरचा अपॉईंट करण्यात आले होते.परंतु,या सुंदरींना  गुप्तहेरांची  मदत  का घ्यावीशी वाटली.याचे कारण तुम्ही ओलखुच शकणार नाही.

या सिनेमात वरूण डबर रोल करत असल्याचे सर्वांनाच माहिती आहे.या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणा-या दोन्ही सुंदर अभिनेत्रींना राजा आणि प्रेम यांच्यातला फरक ओळखणेच कठीण झाले होते.हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज असला तरी जॅकलिन आणि  तापसी मात्र अद्याप  या जुळ्या भावांमधला फरक ओळखू शकलेल्या  नाहीत.त्यामुळे वरूणला यावरून  विनोद कऱण्याची चांगलीच संधी मिळाली. या दोघांच्या मदतीला नेमण्यात आलेल्या  दोन गुप्तहेरांची  यामुळे मात्र सुटका झाली आहे.पण हे दोन गुप्तहेर नेमके होते तरी कोण ? यावरू आता पडदा उठला आहे. ते दुसरे तिसरे कोणीही नसून निक चॅनलवरील लहानग्यांची फेव्हरेट जासूस जोडी होती. गट्टु आणि बट्टु ते जॅकलिन  आणि तापसीला भेटले  आणि काही  युक्त्यांच्यांच्या मदतीने त्यांनी  या जुळ्या भावांचे  पितळ उघडे पडले आहे.

धमालमस्ती करत गट्टू बट्टू यांनी 'जुडवा 2' सिनेमाच्या कलाकरांसह डान्स मस्ती केली. सिनेमासाठी या दोन गुप्तेहरांनी शुभेच्छा  दिल्या आणि त्यांच्या  जासूसी  आणि मस्तीच्या डोसने  सर्वांचे मनोरंजन केले.गट्टू-बट्टूच्या अनोख्या भेटीबाबत  वरूण धवन म्हणाला,माझ्या लहापणापासून 'जुडवा' हा माझा  आवडता सिनेमा होता आणि त्या अनुषंगाने या सेटचा  मी एक भाग आहे.जुडवा  भावांची भूमिका मी साकरात आहे.याचा मला फार आनंद होत आहे.या आनंदात  आणि सेटवर डबल धमाका आणण्यासाठी माझ्या प्रेम आणि राजा  या पात्रांशी  साधर्म्य साधणारे दोन छोटे  गुप्तहेर  गट्टू आणि बट्टू आज आमच्याकडे आले होते.त्यांच्या विविध युक्त्यांनी आमचे मनोरंजन केले.त्यांच्या येण्याने आम्हाला खूप मजा आली.आपला आनंद व्यक्त करताना तापसी पन्नू म्हणाली,प्रेम आणि राजाला ओळकण्यात मला आणि  जॅकलिनला मदत करण्यासाठी आमचा संभ्रम  दूर करण्यासाठी सेटवर दोन गुप्तहेर येणार असल्याचे समजल्यावर मला ते थोडे विचित्र वाटले आणि आश्वर्य वाटले.हे गुप्तहेर म्हणजे दुसरे  तिसरे कोणीही नसून  गट्टू आणि बट्टू आहेत.हे समजल्यावर मात्र मला फार आनंद झाला.त्यांनी राजा  आणि प्रेम  यांना लगेचच ओळखले.

तापसी आणि वरूणसह जॅकलिनने आपव्या भावना व्यक्त करताना म्हटले की,राजा आणि प्रेम ओळखण्यात मी कधीही गोंधळून गेले,तर नेमक्या कोणत्या युक्त्या वापरून मी त्यांना ओळखू शकेन, हे शिकण्यासाठी सेटवर आलेल्या गट्टू आणि बट्टू या दोन  गुप्तहेरांना भेटून मला फार मस्त वाटले.ते आल्यामुळे सेटवर फार मजा आली.ते स्वभावाला आलेल्या गट्टू आणि बट्टू  या दोन गुप्तहेरांना भेटून मला फार मजा आली.ते दोघेही प्रेम आणि राजासारखेच आहेत. 
Web Title: Did the two detectives get help for 'Twilight 2' movie? Know what happened
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.