Did Deepika Padukone and Ranveer Singh secretly play Urkalka? | दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने गुपचूप उरकला साखरपुडा ?

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचे नातं सगळ्या जगाला माहिती आहे. राम लीलाच्या सेटवर सुरु झालेले हे प्रेम आता पद्मावतीपर्यंत येऊन पोहोचले आहे. गेल्या चार वर्षांत अनेक पार्टी आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. वर्ष सरत गेली तसे त्याचे प्रेम अजून बहरत गेले आहे. काही दिवसांपूर्वी बी टाऊनमध्ये या हॉट कपलच्या ब्रेकअपची चर्चा खूप रंगली होती. मात्र नुकतेच दोघांना लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना पाहण्यात आले आहे. लंडनच्या रस्त्यावर एकत्र फिरुन त्यांनी ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. काही दिवसांआधी मुंबईतल्या हॉटेलमधला दोघांमधला एक इंटिमेट व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर दोघे भारतात मीडियासमोर एकत्र आलेच नाहीत. मात्र या व्हिडिओमुळे एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली की दोघांमधले प्रेम चांगले फुलले आहे. दीपिकाने एक कॉमेडी शोमध्ये स्पॉट झाली होती मात्र यावेळी दीपिकाच्या बोटतल्या रिंगने सगळ्यांचे लक्ष वेधले. लंडनवरुन परतल्यानंतर दीपिकाच्या बोटामध्ये रिंग दिसते आहे. याचा अर्थ असा तर नाही दोघांनी गपचुप साखरपुडा केला आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाचे कुटुंबीय आणि रणवीरचे कुटुंबीय दोघांनी लग्न करावे यासाठी त्यांच्या मागे लागले होते. आता खरचं दीपिका आणि रणवीरने आपल्या नात्याला पुढे नेत सारखपुडा केला आहे की नाही हे लवकरच सगळ्यांसमोर येईल.  

ALSO READ : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राणी पद्मावतीबनत दीपिका पादुकोणचे झाले आगमन !

सध्या दीपिका आपल्या कुटुंबीयांसोबत बंगळुरुमध्ये व्हेकेशन एन्जॉय करते आहे. नुकतीच तिने पद्मावतीची शूटिंग पूर्ण केली आहे. यात दीपिकासह रणवीर सिंग आणि शाहिद कपूरची मुख्य भूमिका आहे. संजय लीला भन्साशी दिग्दर्शित या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज सकाळीच लाँच करण्यात आले आहे. यात दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत रॉयल लूकमध्ये दिसते आहे. बाजीराव मस्तानीनंतर दीपिका आणि रणवीरच्या जोडीचा हा दुसरा चित्रपट आहे. आधी हा चित्रपट 19 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र त्यानंतर काही कारणामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट एक डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे कळतेय.   
Web Title: Did Deepika Padukone and Ranveer Singh secretly play Urkalka?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.