अक्षय कुमारने ही गोष्ट करण्यापूर्वी सलमान खानशी केली चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 07:40 PM2019-03-07T19:40:31+5:302019-03-07T19:44:18+5:30

ईद म्हटली की, सलमानचा चित्रपट प्रदर्शित होणार हे त्याच्या चाहत्यांना चांगलेच माहीत आहे आणि बॉलिवूडमधील इतर कलाकार देखील सलमानच्या चित्रपटांच्या भीतीने या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याचे टाळतात.

Did Akshay Kumar call Salman Khan before blocking Eid 2020 for suryavanshi? | अक्षय कुमारने ही गोष्ट करण्यापूर्वी सलमान खानशी केली चर्चा?

अक्षय कुमारने ही गोष्ट करण्यापूर्वी सलमान खानशी केली चर्चा?

googlenewsNext
ठळक मुद्दे२०२० मधील ईदला सलमानचा नव्हे तर अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबात नुकतीच या चित्रपटाच्या टीमकडून घोषणा करण्यात आली आहे.गेल्या आठ वर्षांपासून ईदला सलमानचेच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे सुर्यवंशी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अक्षयने सलमानशी चर्चा केली असल्याचे म्हटले जात आहे.

२००९ पासून सलमान खान आणि ईद हे एक वेगळेच समीकरण बनले आहे. २००९ मध्ये सलमान खानचा वाँटेड हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. तेव्हापासून सलमानचे चित्रपट म्हटले की ते ईदला प्रदर्शित होणार हे एक समीकरणच बनले. त्यामुळेच त्याचे बॉडीगार्ड, दबंग, सुलतान, बजरंगी भाईजान, किक, एक था टायगर, ट्युबलाईट आणि रेस ३ यांसारखे चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित झाले. त्यातील ट्युबलाईट आणि रेस ३ वगळता सगळेच चित्रपट सुपर ड्युपर हिट झाले. त्यामुळे ईद म्हटली की, सलमानचा चित्रपट प्रदर्शित होणार हे त्याच्या चाहत्यांना चांगलेच माहीत आहे आणि बॉलिवूडमधील इतर कलाकार देखील सलमानच्या चित्रपटांच्या भीतीने या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याचे टाळतात.

२०१९ च्या ईदला देखील सलमान खानचा भारत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सलमान गेल्या कित्येक दिवसांपासून भारत या त्याच्या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात कॅटरिना कैफ आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, २०२० मधील ईदला सलमानचा नव्हे तर अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबात नुकतीच या चित्रपटाच्या टीमकडून घोषणा करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून ईदला सलमानचेच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे सुर्यवंशी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अक्षयने सलमानशी चर्चा केली असल्याचे म्हटले जात आहे. सलमानला अक्षयने चित्रपट ईदला प्रदर्शित करण्याबाबत विचारले असून सलमानने त्यावर लगेचच होकार दिला असल्याची चर्चा रंगली आहे.



 

भारत नंतर सलमानचा दबंग ३ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तो लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२० ला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

Web Title: Did Akshay Kumar call Salman Khan before blocking Eid 2020 for suryavanshi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.