'Dhaddar' Girl Madhuri Dixit, 'The Big Disclosure That You Have Me For You!' | ‘धकधक’ गर्ल माधुरी दीक्षितने ‘हम आपके है कौन’बद्दल केला इतका मोठा खुलासा!!

पुन्हा ‘कमबॅक’साठी सज्ज झालेली बॉलिवूडची ‘धकधक’ गर्ल माधुरी दीक्षित अलीकडे भरभरून बोलली. ‘सीधी बात’ या इव्हेंटमध्ये माधुरीने अनेक गोष्टींचा खुलासा केला. अगदी ‘हम आपके है कौन’ या चित्रपटासाठी सलमान खानपेक्षा मिळालेली अधिक फी, श्रीदेवींसोबतचे एकेकाळची स्पर्धा ते तिच्या आगामी मराठी चित्रपटाबद्दल. ‘हम आपके है कौन’ या चित्रपटासाठी सलमानपेक्षा अधिक मानधन मिळाल्याचे माधुरीने कबुल केले. पण कोण किती पैसे घेतलेत, ते त्यावेळी मला माहित नव्हते, असे ती म्हणाली. एखादा चित्रपट साईन करताना हिरोने किती घेतले आणि मग मी इतके घेईल, असे विचारले जात नाही. मला यासाठी किती हवेत, हेच मी सांगितले. कुणाला त्या चित्रपटासाठी किती मिळणार होते, ते म्हणून मला माहित असण्याचे काहीही कारण नव्हते. त्या चित्रपटासाठी माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नव्हताचं. चित्रपट अतिशय चांगला होता. आजही कुठल्या ना कुठल्या चॅनलवर हा चित्रपट असतोच असतो. या चित्रपटासाठी सर्वाधिक पैसा राजश्रीने कमावला, असे माधुरी म्हणाली.
श्रीदेवीसोबत तुझी स्पर्धा होती का? या प्रश्नाला माधुरीने नकारार्थी उत्तर दिले. श्रीदेवी माझ्याआधी चित्रपटांत आल्या होत्या. मी अगदीच नवखी होते. त्यामुळे आमच्यात समांतर स्पर्धा होती, असे मी मानत नव्हतेच. मी फक्त माझे काम करत होते. नशीबाने माझे चित्रपटही चालत होते, असे ती म्हणाली. तुम्हाला माहित असेल तर माधुरीने ‘कलंक’ हा चित्रपट साईन केला आहे. हा चित्रपट श्रीदेवी करणार होत्या. पण त्यांच्या अकाली निधनानंतर या चित्रपटासाठी माधुरीला साईन करण्यात आले.याबद्दल माधुरी म्हणाली की, श्रीदेवींचे असे अचानक जाणे प्रचंड दु:खद आहे. मी त्यांना जवळून ओळखत होते. आमच्यातील स्पर्धेबाबत मीडियात यायचे. पण आम्ही त्याकडे लक्ष दिले नाही. ‘कलंक’ हा माझा एकटीचा नाही तर माझ्याशिवाय आलिया भट्ट, वरूण धवन, संजय दत्त सगळ्यांचाच चित्रपट आहे.
माझी मुली माझे चित्रपट बघत नाहीत. ते थोर, बॅटमॅन, अ‍ॅवेंजर्स असे सुपरहिरोंचे चित्रपट बघतात. त्यामुळे ते माझे फॅन वगैरे अजिबात नाहीत, असेही तिने सांगितले.
 
ALSO READ : २४ वर्षांनंतर माधुरी दीक्षितने बहिणीसोबत ‘लो चली मैं’ या गाण्यावर धरला ठेका!
Web Title: 'Dhaddar' Girl Madhuri Dixit, 'The Big Disclosure That You Have Me For You!'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.