‘मुलांनीच एन्जॉय का करावा?’ असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो. परंतु न्यू यॉर्कला पोहोचलेल्या बॉलिवूडच्या तीन अभिनेत्रींनी फुल टू धमाल करीत ‘एन्जॉय कसा करावा हे मुलींना माहीत असते’ हे दाखवून दिले आहे. आयफा अवॉर्डस्साठी बॉलिवूडचे अनेक तारे-तारका सध्या न्यू यॉर्कला पोहोचले आहेत. याठिकाणचे काही मौजमस्तीचे क्षण कॅमेºयात कैद करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी शेअर करीत आहेत. अभिनेत्री दिया मिर्झा हिने असेच काहीसे मस्तीच्या मुडमधील फोटोज् आपल्या चाहत्यांशी शेअर करीत कॅप्शनमध्ये ‘एन्जॉय कसा करायचा हे मुलींना माहीत असते’ असे लिहिले आहे. फोटोमध्ये दिया, शिल्पा शेट्टी आणि बिपाशा बसू यांच्याबरोबर धमाल करताना दिसत आहे. 
 

खरं तर बॉलिवूड कलाकार त्यांच्या पर्सनल लाइफमधील काही सुखद क्षण आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करीत असतात. मात्र दिया मिर्झा, बिपाशा बसू आणि शिल्पा शेट्टी न्यू यॉर्कमधील धमाल मस्ती त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवित आहेत. लग्नानंतर चित्रपटांपासून दूर राहणाºया या तिन्ही अभिनेत्री जेव्हा एकत्र आल्या तेव्हा त्यांनी एकच धमाल केली. सध्या तिघीही न्यू यॉर्कमध्ये आयफा २०१७ करिता पोहोचल्या आहेत. जेव्हा या तिघी एकमेकींना भेटल्या तेव्हा त्यांनी एकच धमाल केली. या तिघींचे मस्ती करतानाचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 
 

हे फोटो तिघींनीही शेअर केले असून, दिया मिर्झाने कॅप्शनमध्ये ‘एन्जॉय कसा करायचा हे मुलींना माहीत असते.’ असे लिहिले आहे. फोटोमध्ये तिघी काही खाद्यपदार्थांचा स्वाद घेत आहेत, तर कधी रॅम्पवॉकवर जलवा दाखवित आहेत. डायटिंग आणि फिटनेसचा विचार करून दिया आणि शिल्पा स्वीट पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दिसून येत आहे. बिपाशा पती करण सिंग ग्रोव्हर याच्यासोबत न्यू यॉर्कला पोहोचली आहे. आयफा स्टोम्पच्या रॅम्पवर दिया मिर्जा आणि शिल्पा शेट्टीने जलवा दाखविला. शिल्पाने तर रॅम्पवॉक करीत उपस्थितांची दाद मिळविली. 
 

याबाबतचा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी शिल्पाने डिझायनर फाल्गुनी शीन पीकॉकचा सिल्व्हर आणि ब्लॅक गाउन परिधान केला होता. 
Web Title: Dera Mirza's message, 'girls know how to enjoy!'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.