Demanded mobile number! Shah Rukh Khan shot! | ​चाहत्याने मागितला मोबाईल नंबर! शाहरूख खानने घेतली फिरकी!!

शाहरूख खान इंडस्ट्रीत हजरजबाबी म्हणून ओळखला जातो. आपल्या चाहत्यांसोबतही शाहरूख अनेकदा मस्करी करताना दिसतो.  twitter अकाऊंटवर चाहत्यांच्या प्रश्नांला   शाहरूख अशीच मजेशीर उत्तरे देताना दिसतो. ताजे  उदाहरण द्यायचे झाल्यास त्याचे हे tweet तुम्ही वाचायलाच हवे. एका चाहत्याने अगदी निरागसपणे शाहरूखकडे एक विनंती केली. पण  सरळ बोलेल तो शाहरूख कुठला. त्याने या चाहत्याची मस्तपैकी फिरकी घेतली.  आता हा सगळा किस्सा तुम्हाला सांगायलाच हवा. तर त्याचे झाले असे की, एका चाहत्याने शाहरूखला त्याचा मोबाईल नंबर मागितला. ‘तू तुझा नंबर मला देशील? असा प्रश्न या चाहत्याने शाहरूखला केला. यावर शाहरूखने काय उत्तर दिले माहितीयं? होय, पाठवतो ना. आधार क्रमांकही पाठवू का? असे शाहरूखने लिहिले.मोबाईल नंबर मागणारा चाहताही मोठा चिवट निघाला. त्याने शाहरूखचे उत्तर ऐकून लगेच नवे tweet केले. मला तुझा मोबाईल नंबर नको, ना आधार नंबर. मला केवळ तुझी एक मिठी हवी, असे हा चाहता म्हणाला. यावर शाहरूखनेही या चाहत्याला निराश न करता, होय पाठवतो, असे उत्तर दिले.

ALSO READ : SEE PICS : ​‘कुछ कुछ होता है’ पार्ट २ बघायचायं? मग शाहरूख खान व काजोलचे हे फोटो पाहाच!!

सध्या शाहरूख खान ‘टेड टॉक्स’ या टीव्ही शोमध्ये बिझी आहे. गत १० डिसेंबरपासून सुरु झालेल्या या शोचा प्रोमो शाहरूखने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. शाहरूख यापूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’,‘क्या आप पांचवी पास से तेज है’, ‘जोर का झटका’ अशा शोमध्ये दिसला आहे. याशिवाय लवकरच शाहरूख आनंद एल राय यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. शाहरूख या चित्रपटात बुटक्या व्यक्तीच्या रूपात दिसणार असल्याचे मानले जात आहे. शाहरूखची ही व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. या चित्रपटात कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. यात ती ‘मेरी जान’ नामक पात्र साकारणार आहे. आधी हा चित्रपट सलमान खान करणार होता. त्याला ही कथा प्रचंड आवडली होती. पण अचानक सलमानने या चित्रपटाला नकार कळवला आणि हा चित्रपट शाहरूखकडे आला.

Web Title: Demanded mobile number! Shah Rukh Khan shot!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.