#DeepVeer : दीपिका-रणवीरच्या लग्नावरचे भन्नाट मीम्स पाहा अन् पोट धरून हसा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 09:48 PM2018-10-22T21:48:16+5:302018-10-22T21:49:24+5:30

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर दीपिका-रणवीर, दीपवीर हे हॅशटॅग ट्रेंड होणे सुरू झाले. केवळ इतकेच नाही तर मजेशीर मीम्सचाही पाऊस पडला.

#DeepVeer: hilarious memes going viral after ranveer singh and deepika padukone wedding announcement | #DeepVeer : दीपिका-रणवीरच्या लग्नावरचे भन्नाट मीम्स पाहा अन् पोट धरून हसा!!

#DeepVeer : दीपिका-रणवीरच्या लग्नावरचे भन्नाट मीम्स पाहा अन् पोट धरून हसा!!

googlenewsNext

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर दीपिका-रणवीर, दीपवीर हे हॅशटॅग ट्रेंड होणे सुरू झाले. केवळ इतकेच नाही तर मजेशीर मीम्सचाही पाऊस पडला. लोकांनी रणवीर व दीपिकावर एकापेक्षा एक भन्नाट मीम्स बनवत, अगदी धम्माल केली.
या मीम्समध्ये रणवीर सिंगच्या फॅशन सेन्सपासून तर दोघांच्या मोबाईल ब्रँडपर्यंतचे मीम्स व्हायरल झालेत.
अनेक युजर्सनी  रणवीरच्या यानिमित्ताने रणवीर सिंगच्या अतरंगी फॅशन सेन्सची खिल्ली उडवली. आपल्या लग्नात रणवीर सिंग शेरवानी घालेल की घागरा, असा प्रश्न एका युजरने विचारला.




एका युजरने लहंग्याचा फोटो शेअर करत, हा बघा रणवीरचा वेडिंग ड्रेस असे मजेशीर कॅप्शन दिले.




एका युजरने तर आणखी एक पाऊल पुढे टाकत, रणवीरच्या कपड्यांवर भन्नाड कमेंट केली़. रणवीर लग्नात आपले कपडे घालून उभा राहणार, हे माहित पडल्यावर दीपिकाची प्रतिक्रिया कशी असेल, हे त्याने लिहिले.




रणवीर व दीपिकाने संजय लीला भन्साळींच्या अनेक चित्रपटात काम केले. भन्साळींच्या चित्रपटाच्या सेटवर रणवीर-दीपिकाचे प्रेम बहरले़ यावरूनही अनेकांनी जोक्स केलेत. दीपिका-रणवीरच्या लग्नात भटजीही भन्साळीचं असतील, अशी गुगली एका युजरने टाकली.
हे मीम्स तुम्हीही पाहा आणि पोट धरून हसा...




 









 

Web Title: #DeepVeer: hilarious memes going viral after ranveer singh and deepika padukone wedding announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.