Deepika's 'Ghumar' announces in America; Skating on the ice, the dancing dance, watch the video! | अमेरिकेतही दीपिकाच्या ‘घूमर’चा निनाद; बर्फावर स्केटिंग करीत केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ!

प्रचंड वादानंतर प्रदर्शित झालेला ‘पद्मावत’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच दीपिकाच्या ‘घुमर’ने सातासमुद्रापार डंका वाजविला आहे. वास्तविक दीपिकाचे हे गाणे प्रदर्शनाअगोदर चांगलेच वादाच्या भोवºयात सापडले होते. दीपिकाच्या डान्सवर आक्षेप घेताना त्याला विरोध करण्यात आला होता. अखेर गाण्यात काही बदल करून त्याचा चित्रपटात समावेश करण्यात आला. पण काहीही असो, या गाण्याचा स्वर केवळ भारतातच नव्हे विदेशात घुमताना दिसत आहे. होय, विदेशात हे गाणे जबरदस्त हिट होत आहे. याची प्रचिती सोशल मीडियावर येत आहे. होय, सोशल मीडियावर घुमर हे गाणे व्हायरल होत असून, त्यावरून एक तरुणी बेभान होऊन डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील असून, एक भारतीय तरुणी चक्क बर्फावर स्केटिंग करताना डान्स करीत आहे. आइस स्केटर भंडारी यांनी मयूरी या तरुणीचा बर्फावरील डान्स शूट केला आहे. ती ‘घूमर’ या गाण्यावर डान्स करताना दिसते. मयूरीचा हा डान्स बघून दीपिका हरकून गेली नसेल तरच नवल. मयूरीचा हा व्हिडीओ २६ जानेवारी रोजी यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत या व्हिडीओला चार लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. जेव्हा हे गाणे रिलीज झाले होते तेव्हा प्रचंड विरोध झाला होता. गाण्यात दीपिकाच्या उघड्या कमरेवरून आक्षेप घेतला होता. अखेर दीपिकाला पूर्ण कपड्यांमध्ये दाखवित या गाण्याला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. पण काहीही असो ज्यापद्धतीने गाण्याला लोकप्रियता मिळत आहे, ते खरोखरच वाखाणण्याजोगे म्हणावे लागेल. 
Web Title: Deepika's 'Ghumar' announces in America; Skating on the ice, the dancing dance, watch the video!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.