Deepika Padukone's name Ranbir's name tattoo still persisted! Proof of this! | दीपिका पादुकोणच्या मानेवरचा रणबीरच्या नावाचा टॅटू अद्यापही कायम! हा घ्या पुरावा!

बॉलिवूडची आयकॉन बनलेली दीपिका पादुकोण रिल लाईफसोबतच तिच्या रिअल लाईफबद्दलही चर्चेत असते. उदाहरण द्यायचे झाल्यास दीपिकाने गोंदवलेला टॅटू. होय, दीपिकाने तिच्या मानेवरचा एक टॅटू हटवला की नाही, यावरून सध्या चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका बांगलादेशातील एका सोपच्या जाहिरातीत दिसली होती. या जाहिरातीनंतर हे स्पष्ट झाले होते की, दीपिका पादुकोणने तिचे पहिले प्रेम अर्थात रणबीर कपूरचे प्रेम विसरत, त्याच्या नावाचा मानेवर गोंदवलेला टॅटू काढून टाकला आहे. पण असे नाहीच मुळी. दीपिकाने हा टॅटू काढलेला नाही, याचे पुरावेच आम्ही तुम्हाला देणार आहोत. होय, रणबीर कपूरच्या प्रेमाची निशानी असलेला हा टॅटू दीपिकाच्या मानेवर जसाच्या तसा आहे. विश्वास बसत नसेल तर हे काही फोटो पाहा. बांगलादेश अ‍ॅड शूटनंतर दीपिका न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेट गालाच्या रेड कार्पेटवर दिसली होती. या रेड कार्पेटवरील दीपिकाचे फोटो काळजीपूर्वक बघितल्यास, तिच्या पाठीवर गोंदवलेला टॅटू जसाच्या तसा असल्याचे दिसतेय. एकंदर काय तर बांगलादेशातील त्या अ‍ॅड सोपदरम्यानही तिच्या मानेवर टॅटू होता. पण एडिटींगमध्ये तो पुसरण्यात आला इतकेच.ALSO READ : पुन्हा दिसणार दीपिका पादुकोण व इरफान खानची आॅनस्क्रीन केमिस्ट्री!

दीपिका व रणबीर कपूरचे अफेअर चांगलेच गाजले होते. या रिलेशनशिपदरम्यान दीपिकाने रणबीरच्या नावाचा टॅटू आपल्या मानेवर गोंदवला होता. पण काही वर्षांनंतर रणबीर व दीपिकाचे ब्रेकअप झाले. अर्थात तरिही दीपिकाने हा टॅटू हटवला नाही. यानंतर अनेकदा दीपिका हा टॅटू हटवणार असल्याच्या बातम्या आल्या. पण या बातम्या केवळ बातम्याच ठरल्या. कारण दीपिकाने हा टॅटू अद्यापही हटवलेला नाही. यावरून काय अर्थ काढायचा तो तुम्ही काढा!
Web Title: Deepika Padukone's name Ranbir's name tattoo still persisted! Proof of this!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.