Deepika Padukone's 'ha' is Valentine's Day Plan! | दीपिका पादुकोणचा ‘हा’ आहे व्हॅलेटाइन डे प्लॅन!

‘पद्मावत’च्या यशामुळे प्रचंड खूश असलेली मस्तानी दीपिका पादुकोण सध्या तिच्या लग्नावरून चांगलीच चर्चेत आहे. बॉयफ्रेंड रणवीर सिंगसोबत ती यावर्षी लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे बोलले जाते. खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या दोघांच्या लग्नाच्या अफवा पसरविल्या जात आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघे दीपिकाच्या वाढदिवशी साखरपुडा करणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु नंतर ही अफवा ठरली. आता या दोघांच्या डेस्टिनेशन वेडिंगची चर्चा रंगत आहे. मात्र हीदेखील अफवा ठरणार की, खरंच दीपिका यावर्षी लग्नाच्या बंधनात अडकणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

दरम्यान, सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून, दीपिका हा दिवस कसा साजरा करणार हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. याविषयी जेव्हा दीपिकाला विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, ‘प्रेम प्रत्येक दिवशी साजरे केले पाहिजे. मी सध्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्यादिवशीही मी कामच करेन.’ दीपिका विशाला भारद्वाजच्या आगामी चित्रपटात अभिनेता इरफान खानसोबत झळकणार आहे. या चित्रपटाचे अजूनपर्यंत नाव निश्चित झाले नसले तरी, शूटिंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे व्हॅलेंटाइन डे ला दीपिका इरफानसोबत शूटिंगमध्ये व्यस्त असणार आहे. दरम्यान, बॉलिवूडलाईफ.कॉमने दिलेल्या माहितीनुसार, रणवीर आणि दीपिका समुद्रकिनारी लग्न करण्याची योजना आखत आहेत. त्यामुळे त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग हे समुद्रकिनारी असेल असे बोलले जात आहे. लग्नाला फक्त दीपिका आणि रणवीरच्या परिवारातीलच लोक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर विरुष्काप्रमाणे हे दोघे त्यांच्या मित्रांसाठी ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत. सध्या हे दोघेही त्यांच्या ‘पद्मावत’ला मिळत असलेल्या यशामुळे खूश आहेत. त्याचबरोबर या दोघांची जोडी पुन्हा एकदा हिट ठरल्याने, त्यांच्यासाठी हा आनंद द्विगुणित करणारा आहे. 
Web Title: Deepika Padukone's 'ha' is Valentine's Day Plan!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.