Deepika Padukone wrote, 'They did not commit suicide, but they took their victims' depression'! | दीपिका पादुकोणने लिहिले, ‘त्यांनी आत्महत्या केली नाही, तर डिप्रेशनने त्यांचा बळी घेतला’ !

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणने आपल्या लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशनच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती डिप्रेशनवर आपले मत मांडताना दिसत आहे. तिने या पोस्टमध्ये दावा केला की, केट स्पेड आणि एंथोनी बॉर्डन यांनी आत्महत्या केली नाही, तर तणावाने त्यांचा बळी घेतला. केट स्पेड प्रसिद्ध अमेरिकन फॅशन डिझायनर होते. ५ जून रोजी ५६ वर्षीय केट यांना त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत बघण्यात आले. त्यांच्याजवळ एक सुसाइड नोट सापडून आली. तर ६२ वर्षीय अमेरिकन टीव्ही कलाकार एंथोनी बॉर्डन यांनी ८ जून रोजी आपल्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवरच दीपिकाने ही पोस्ट लिहिली आहे. 

दीपिकाच्या पोस्टनुसार, दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. तिने लिहिले की, गेल्या आठवड्यात जगातील दोन कर्तृत्ववान कलाकारांचा हा महामारीने बळी घेतला. ते प्रचंड तणावात होते. ते स्वत:ला संपवू इच्छित नव्हते; मात्र तणावामुळे त्यांनी स्वत:चा जीव घेतला. दीपिकाने पुढे लिहिले की, आपण हे कधीच विचारत नाही की, कोण कशा पद्धतीने आजारी पडले आहे ? परंतु तणाव हा असा आजार आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून अजिबातच चालणार नाही. 
 

सद्यस्थितीचा जर विचार केला तर ‘तणाव’ ही सर्वात मोठी महामारी म्हणून पुढे येत आहे. एखाद्याला यामधून बाहेर पडण्याचा सल्ला देणे म्हणजे एखाद्या दुर्लभ व्यक्तीला सल्ला देण्यासारखे आहे. आमचे लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशन त्यासाठी कटिबद्ध आहे, ज्यांच्यासाठी आम्हाला खंबीरपणे उभे राहायचे आहे. मेंटल हेल्थ जनजागृतीसाठी सातत्याने कॅम्पेनिंग होण्याची गरज आहे. 

दीपिकाच्या मते तणावाला आयुष्यातून हद्दपार करता येऊ शकते. त्यासाठी थोडेसे चौकस राहावे लागेल. जेव्हा-जेव्हा तुम्हाला परिवारातील सदस्य, मित्र किंवा कामाच्या ठिकाणच्या सहकाºयांमध्ये अस्वस्थता जाणवते तेव्हा तुम्ही त्यांना त्याबाबतचे कारण विचारण्यास अजिबात संकोच करू नका. जर ते त्यांच्या मनातील दु:ख सांगण्यास तयार नसतील तेव्हा तुम्ही त्यांना आश्वस्त करायला हवे की, मी तुझ्यासोबत आहे. त्यामुळे जेव्हा-केव्हा तुला याविषयी सांगायचे असेल तेव्हा ते तू मनमोकळेपणाने मला सांगू शकतोस. 
Web Title: Deepika Padukone wrote, 'They did not commit suicide, but they took their victims' depression'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.