Deepika Padukone will do the work after Anushka and Priyank! Soon a happy news !! | ​अनुष्का व प्रियांकानंतर दीपिका पादुकोणही करणार ‘हे’ काम! लवकरच देणार एक आनंदाची बातमी!!

गेल्या काही दिवसांपासून दीपिका पादुकोण सतत तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. दीपिकाने लग्नाचे शॉपिंग सुरु केले इथपासून तर तिच्या डेस्टिनेशन वेडिंगपर्यंत अनेक त-हेच्या बातम्या येत आहेत. या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे दीपिकाने स्पष्ट केलेयं. पण तरिही या बातम्या थांबलेल्या नाहीत. आता मात्र दीपिकाबद्दल एक वेगळीच बातमी आहे.  दीपिका सुद्धा अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्राच्या पावलावर पाऊल ठेवत चाहत्यांना एक आनंदाची बातमी देणार आहे. ही बातमी कुठली तर प्रॉडक्शन हाऊस खोलण्याची. होय, प्रियांकाच्या पर्पल पेबल पिक्चर्स आणि अनुष्का शर्माच्या क्लीन स्लेट पिक्चर्सनंतर दीपिकाही स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस खोलणार आहे. यापूर्वी अनेकदा निर्माती बनण्याची इच्छा दीपिकाने बोलून दाखवली आहे. अलीकडे एका मुलाखतीत दीपिकाने ही इच्छा तीव्रपणे बोलून दाखवली होती. ‘मी माझे प्रॉडक्शन हाऊस उघडू इच्छिते. या माध्यमातून मला हव्या तशा विषयांवर चित्रपट बनवण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी हे एक्साइटींग असेल. नवे काही करण्याची संधी मला यामुळे मिळेल,’असे ती म्हणाली होती. २०१५ मध्ये दिलेल्या मुलाखतीतही ती हेच बोलली होती. मला पैशासाठी निर्माता बनायचे नाही. मला गोष्टी आॅर्गनाईज करायला आवडतात. माझी पर्सनॅलिटीही तशीच आहे. म्हणून मी या पेशात येऊ इच्छिते, असे दीपिका म्हणाली होती.

ALSO READ : दीपिका पादुकोणच्या तालावर कॅप्टन कुल महेन्द्र सिंह धोनीचा ‘धन धना धन’ डान्स!

अद्याप दीपिकाने तिच्या प्रॉडक्शन हाऊसची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण लवकरच ती करेल, अशी अपेक्षा आहे. आता दीपिकाने ही घोषणा केली तर तिच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट कुठला असेल, हे बघणे इंटरेस्टिंग असणार आहे.
अलीकडे दीपिकाचा ‘पद्मावत’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने रेकॉर्ड तोड कमाई केली. ‘पद्मावत’नंतर दीपिका विशाल भारद्वाज यांच्या ‘सपना दीदी’ या चित्रपटात दिसणार आहे. यात दीपिकाच्या अपोझिट इरफान खानचे नाव फायनल झाले होते. पण या चित्रपटाचे शूटींग सुरू होण्याआधीच इरफानच्या आजाराची बातमी आली. न्युरो इंडोक्राईन ट्युमर या दुर्धर आजाराने इरफानला ग्रासले आहे. सध्या विदेशात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे ‘सपना दीदी’चे शूटींग पुढे ढकलण्यात आले आहे.
Web Title: Deepika Padukone will do the work after Anushka and Priyank! Soon a happy news !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.