'पीकू'साठी दीपिका पादुकोण नव्हती निर्मात्यांची पहिली चॉईस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 09:00 PM2019-06-23T21:00:00+5:302019-06-23T21:00:00+5:30

दीपिका पादुकोणने 2015 मध्ये 'पीकू' बनून चाहत्यांची मनं जिंकली होती. या सिनेमासाठी दीपिकाने अनेक अॅवॉर्ड्सदेखील आपल्या नावावर केले होते.

Deepika padukone was not the first choice for piku parineeti chopra revealed | 'पीकू'साठी दीपिका पादुकोण नव्हती निर्मात्यांची पहिली चॉईस

'पीकू'साठी दीपिका पादुकोण नव्हती निर्मात्यांची पहिली चॉईस

googlenewsNext
ठळक मुद्दे'पीकू'मध्ये दीपिकाने अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.

दीपिका पादुकोणने 2015 मध्ये 'पीकू' बनून चाहत्यांची मनं जिंकली होती. या सिनेमासाठी दीपिकाने अनेक अॅवॉर्ड्सदेखील आपल्या नावावर केले होते. 'पीकू'मध्ये दीपिकाने अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. मात्र या सिनेमासाठी दीपिका मेकर्सची पहिली चॉईस नव्हती स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा मेकर्सची पहिली चॉईस होती. 


नेहा धुपियाच्या शोमध्ये परिणीती चोप्राने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला की, दीपिकाच्या आधी ही भूमिका परिणीतीला ऑफर करण्यात आली होती. या भूमिकेसाठी नकार दिल्याचा पश्चात्याप तिला आजही असल्याचे तिने सांगितले. पुढे ती म्हणाली, मी हा सिनेमा सोडला नव्हता पण मी कन्फ्युज होते. त्यावेळी मी दुसऱ्या सिनेमात काम करत होते आणि तो सिनेमा तयार झालाच नाही आणि सगळं नुकसान माझंच झालं.  


'पीकू' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली होती. इरफान खानसुद्धा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनी सिनेमाला पसंती दिलीय.

 


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हिंदी रिमेकमध्ये परिणीती दिसणार आहे.जुलैच्या मध्यापर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाची कथा २०१५ साली सर्वाधिक विक्री झालेल्या पॉला हॉकिन्सच्या पुस्तकावर आधारित असून यामध्ये एका घटस्फोटीत महिलेची कथा रेखाटण्यात आली आहे.ही महिला एका हरवलेल्या व्यक्तीच्या तपास प्रक्रियेत गुंतते आणि तिचे जीवन कसे धोक्यात येते, याचे वर्णन करण्यात आले आहे. ती हॉलिवूडपटात एमिली ब्लंटने साकारलेली भूमिका परिणीती साकारणार आहे.

Web Title: Deepika padukone was not the first choice for piku parineeti chopra revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.