Deepika Padukone was injured during exercise | दीपिका पादुकोणला व्यायाम करताना झाली दुखापत

अभिनेत्री दीपिका पादुकोण चित्रपट 'पद्मावत'नंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती विमानतळावर तिच्या हटके स्टाईलमध्ये दिसून आली पण ह्याच वेळेस तिच्या मानेला दुखापत झालेली दिसून आली. दीपिका आगामी चित्रपटाचे चित्रिकरण करताना जखमी तर नाही झाली ना? चला तर मग जाणून घेऊ खरे कारण...

दीपिका पादुकोण नुकतीच विमानतळावर दिसून आली तिच्या मानेला दुखापत झाल्यामुळे तिने दोन पट्ट्या लावल्या होत्या एवढी दुखापत होऊन ही ती तिच्या फॅन्ससाठी तिचे सुंदर असे देत होती. लोकांचे म्हणणे असे होते की ती तिच्या आगामी चित्रपटाच्या चितीकरणाच्या वेळेस जखमी झाली असावी.

खरंतर असे आहे की दीपिका स्वतःला फिट ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करते त्याचवेळेस व्यायाम करताना तिच्या मानेवर दबाव पडल्यामुळे तिच्या मानेला दुखापत झाली, ह्या चा व्हिडीओ तिच्या जिम ट्रेंनर ने म्हणजेच यासीम काराचीवाला ने काही दिवसांपूर्वी शेअर सुद्धा केला होता. ह्या व्हिडिओ मध्ये दीपिका स्वान डाईव प्रकारचा व्यायाम करताना दिसत आहे, दीपिकाची ही दुखापत जास्त गंभीर नाही आहे.

नुकेतच दीपिकाने वर्ल्डच्या टॉप एक्टर्सच्या लिस्टमध्ये तिसरे स्थान पटाकवले आहे. या यादीत ड्वेन जॉनसन आणि केविन हार्ट पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. या लिस्टमध्ये अभिनेत्रींची निवड त्यांची पॉप्युलारिटी, सोशल मीडिया - फेसबूक, ट्विटर यावरुन त्यांचे फॅन फॉलोविंगची संख्या लक्षात घेऊन करण्यात आली आहे. याशिवाय आणखीन एकबाब लक्षात घेण्यात आली आहे ती म्हणजे दर आठवड्याला यांच्या फॅन्सच्या संख्येत किती वाढ होते याची आणि किती लोक त्यांचे अकाऊंट सब्सक्राइब करतात.   

सध्या बॉलिवूडमध्ये दीपिका आणि रणवीर सिंगच्या लग्नाची चर्चा आहे. विराट कोहली व अनुष्का शर्मासारखेच हे दोघेही डेस्टिनेशन वेडिंग करण्याच्या विचारात आहेत.  या डेस्टिनेशन वेडिंगची सध्या जोरात चर्चा आहे. पण रणवीर व दीपिका दोघांनाही समुद्र किनारा खूप आवडतो. 

ALSO READ :  ​Shocking: दीपिका पादुकोणच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करायची इच्छा आहे तिच्या लहान बहिणाची..

 

Web Title: Deepika Padukone was injured during exercise
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.