Deepika Padukone seen workout after celebrating Birthday with Boyfriend! | बॉयफ्रेंडसोबत बर्थ डे सेलिब्रेट केल्यानंतर वर्कआउट करताना दिसली दीपिका पादुकोण!

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिने काही दिवसांपूर्वीच तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग तिच्यासोबत होता. विदेशात झालेल्या या सेलिब्रेशननंतर दोघेही भारतात परतले असून, आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झाले आहेत. नुकतीच दीपिका जीममध्ये वर्कआउट करताना दिसली. दीपिकाची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला हिने तिच्या ट्विटर हॅण्डलवर एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये दीपिका वर्कआउट करताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना यास्मिनने, ‘“@deepikapadukone doing the Forward Lunge on the #WundaChair. Don’t get fooled by the ease with which you see her executing it, as it really challenges your balance and stability.’ असे लिहिले. 

गेल्या ५ जानेवारीला दीपिकाने तिचा ३२ वा वाढदिवस बॉयफ्रेंड रणवीर सिंगसोबत साजरा केला. यावेळी दीपिकाच्या परिवारातील काही सदस्यही उपस्थित होते. दीपिका तिच्या वाढदिवशी रणवीरसोबत साखरपुडा करणार असल्याची चर्चा होती. परंतु हे दोघे साखरपुडा न करताच परतल्याने ही चर्चा निव्वळ अफवा ठरली. परंतु ज्या पद्धतीने दोघे एकमेकांसोबत दिसत आहेत, त्यावरून लवकरच हे दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतील असेच काहीसे संकेत मिळत आहेत. 
 

काही दिवसांपूर्वीच रणवीर दीपिकाच्या आजीला त्यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी गेला होता. या लव्हली कपलने नवे वर्ष मालदीव येथे सेलिब्रेट केले होते. बºयाच काळानंतर या दोघांनी एकत्र टाइम स्पेंड केला. कारण त्यांच्यात सर्व  काही आलबेल नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मधल्या काळात तर त्यांचे ब्रेकअप झाल्याचेही बोलले जात होते. परंतु हे दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. या कपलचा सर्वाधिक वादग्रस्त असलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट येत्या २५ तारखेला रिलीज होत आहे. 
Web Title: Deepika Padukone seen workout after celebrating Birthday with Boyfriend!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.