Deepika Padukone removes Ranbir Kapoor's last reminder, this is proof! | दीपिका पादुकोणने रणबीर कपूरची शेवटची आठवण ही पुसली, हा घ्या पुरावा !

दीपिका पादुकोण  ही रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती हे आता सगळ्यांच माहिती आहे. रणबीरसोबत रिलेशनशीपमध्ये असताना ती त्याच्या प्रेमात अखंड बुडाली होती. तिने आपल्या मानेवर रणबीरच्या नावाचा ‘आर.के.’ असा टॅटू गोंदला होता. मात्र त्यानंतर काही काळाने त्यांचे ब्रेकअप झाले. मात्र दीपिकाच्या मानेवरचा रणवीरच्या नावाचा टॅटू तसाच होता. 

काही दिवसांपूर्वी दीपिका मुंबई एअरपोर्टवर दिसली होती. त्यावेळी त्याच्या मानेवर  टॅट्टू काढलेल्या भागावर  पट्ट्या लावलेल्या दिसल्या. मात्र दीपिकाला वर्कआऊट करताना दुखापत झाल्याचे बोलले गेले. मात्र आता एक वेगळेच कारणसमोर येते आहे. राणी पद्मावतीने तिच्या आयुष्यातील काही गोष्टी पूर्णपणे विसरण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तिने या टॅट्टूची सर्जरी केल्याचे म्हटले जात आहे. रणबीरशी ब्रेकअप झाल्यानंतर ही त्याच्यांतील मैत्रिचे नातं आजही टिकून आहे. 


ALSO READ :  अभिनेत्री नसती तर दीपिका पादुकोण असती एक मोठी कवयित्री! हा घ्या पुरावा!!

रणबीरशी ब्रेकअप झाल्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंगचं आगमन झालं. लवकरच दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची देखील चर्चा रंगायला लागली आहे. रामलीलाच्या सेटवर दीपिकाचे रणवीरशी सूत जुळले.  दीपिका व रणवीर विराट कोहली व अनुष्का शर्मासारखेच डेस्टिनेशन वेडिंग करण्याच्या विचारात आहेत. होय, या डेस्टिनेशन वेडिंगची सध्या जोरात चर्चा आहे. हे डेस्टिनेशन वेडिंग कुठे होईल, तूर्तास याबद्दल ठोस माहिती नाही. पण रणवीर व दीपिका दोघांनाही समुद्र किनारा खूप आवडतो. त्यामुळे लग्नासाठी बीच वेडिंगचा पर्याय निवडला जाण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या लग्नाला केवळ रणवीर व दीपिकाचे अतिशय जवळचे मित्र व नातेवाईक हेच तेवढे हजर असतील असेही कळतेय. सूत्रांच्या मते, लग्नानंतर दोन रिसेप्शन होतील. दीपिकाचे कुटुंब बेंगळुरूत राहते. त्यामुळे दीपिकाच्या नातेवाईकांसाठी एक रिसेप्शन बेंगळुरूत होईल. तर  रणवीरचे नातेवाईक व बॉलिवूडच्या मित्रांसाठी दुसरे रिसेप्शन मुंबईत दिले जाईल.
Web Title: Deepika Padukone removes Ranbir Kapoor's last reminder, this is proof!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.