कधी काळी रसिकांना पोट धरुन हसायला लावणारा व्यक्ती स्वतःला बंद खोलीत कोंडून घेईल याची कल्पना कुणीच केली नव्हती. प्रसिद्ध कॉमेडिअन आणि अभिनेता कपिल शर्मासाठी हा काळ सगळ्यात जीवनातील आव्हानात्मक आणि संघर्षाचा काळ आहे. त्यामुळेच कपिल डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याचा परिणाम त्याच्या करियरवर झाला.मात्र अशाप्रकारे डिप्रेशनमध्ये गेलेला कपिल हा काही बॉलिवूडचा एकमेव अभिनेता नाही. याआधी अनेकांनी अशाप्रकारच्या डिप्रेशनचा सामना केला आहे.जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार.

कपिल शर्मा

स्टारडम सांभाळणं आणि ती बराच काळ समर्थपणे टिकवून ठेवणं हे प्रत्येकालाच जमत नाही. जितक्या वेगाने कपिल लोकप्रियतेच्या यशशिखरावर पोहचला तितक्याच झटकन तो खालीही फेकला गेला. स्वतःला मिळालेलं स्टारडम तो सांभाळू शकला नाही आणि वाट चुकला. विमानप्रवासात सहकलाकारांना मारहाण करणं इथपासून ते आपल्या शोमध्ये पाहुण्यांना वाट बघायला लावणं सगळं काही कपिलच्या विरोधात घडू लागलं. परिणामी या सगळ्या गोष्टींमुळे कपिल डिप्रेशनमध्ये गेला. स्वतःला तो बंद खोलीत कोंडून घेत असे. कुणाला भेटत नसे. नुकतंच त्यानं बंगळुरु इथं जाऊन डिप्रेशनवर उपचार घेतल्याचं समजतंय.

दीपिका पादुकोण
2014 साली आपणही डिप्रेशनचे शिकार बनलो होतो हे बाब अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनं गेल्याच वर्षी आपल्या फॅन्ससह शेअर केली. बराच काळ या डिप्रेशनमुळे दीपिका एकटी पडली होती. मात्र आपली प्रचंड इच्छाशक्ती आणि थोडे फार उपचार याच्या जोरावर या डिप्रेशनमधून बाहेर पडल्याचं तिने सांगितले. हा डिप्रेशनचा कालावधी खडतर आणि आव्हानात्मक होता असंही तिने सांगितले.

शाहरुख खानबॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरुखलाही कधी काळी डिप्रेशनचा सामना करावा लागला होता असं सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र 2008 साली शाहरुख डिप्रेशनमध्ये गेला होता. तो इतक्या डिप्रेशनमध्ये होता की त्यानं स्वतःला जखमीही करुन घेतलं होतं. ही इतकी गंभीर जखम होती की त्यासाठी शाहरुखला ऑपरेशन करावं लागलं होतं. मात्र शाहरुखने मोठ्या धैर्याने या डिप्रेशनचा सामना केला आणि त्यातून बाहेर पडला

अमिताभ बच्चन

हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह, महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनाही डिप्रेशन आलं होतं. 1996 साली बिग बी अभिनेत्यापासून निर्माता बनले होते. त्यांनी त्यावेळी एबीसीएल नावाची कंपनी सुरु केली. मात्र या कंपनीच्या बॅनरखाली निर्मिती झालेले सगळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर धडाधड आपटले आणि बिग बी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले. कर्जाच्या या ताणतणावामुळेच बिग बी डिप्रेशनमध्ये गेले होते. मात्र वेळीच अमिताभ बच्चन यांनी स्वतःला सावरलं. डिप्रेशनपुढे स्वतःला हरु न देता त्याचा त्यांनी सामना केला. हळूहळू जाहिराती आणि छोट्या पडद्यावरील केबीसीमधून काम करत त्यांनी उभारी घेतली. यानंतर बिग बींनी मागे वळून पाहिलंच नाही. सिनेमा असो किंवा छोटा पडदा वयाच्या 75मध्येही बिग बींचा उत्साह तितकाच दांडगा असल्याचे पाहायला मिळत आहे.

मनीषा कोईरालाअभिनेत्री मनीषा कोईराला हिने सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या मानसिक स्थितीबाबत एकदा पोस्ट केली होती. पती सम्राट दहलालसोबत बिघडणारे संबंध यामुळे तिचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. या तणावामुळेच मनीषा क्लीनिकल डिप्रेशनमध्ये गेली. मात्र आता पतीसह घटस्फोट आणि कॅन्सरशी लढा देऊन मनीषा सावरली असून आयुष्याच्या नव्या लढाईसाठी सज्ज झाली आहे.
Web Title: Deepika Padukone or otherwise, the stars of Bollywood had to face the depression
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.