साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्रीची लाणणार वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 09:00 PM2019-03-31T21:00:00+5:302019-03-31T21:00:02+5:30

साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकमध्ये तापसी पन्नू काम करणार असल्याचे वृत्त काही वर्तमानपत्रांनी दिले होते. पण आता तापसी नव्हे तर संजय लीला भन्साळीची आवडती अभिनेत्री या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे म्हटले जात आहे.

Deepika Padukone is not in Sanjay Leela Bhansali's film on Sahir Ludhianvi | साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्रीची लाणणार वर्णी

साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्रीची लाणणार वर्णी

googlenewsNext
ठळक मुद्देदीपिका या चित्रपटात अमृता प्रितम यांची व्यक्तिरेखा साकारणार असल्याचे वृत्त अनेक वर्तमानपत्रांनी दिले होते. पण आता दीपिका देखील या चित्रपटाचा भाग नसणार असल्याचे म्हटले जात आहे.

साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. सुप्रसिद्ध कवी आणि लेखक साहिर लुधियानवी यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची इच्छा संजय लीला भन्साळींनी बोलून दाखवली होता. त्याला आता बराच काळ लोटला असून यानंतर भन्साळी या बायोपिकवर काहीही बोललेले नाहीत. पण त्यांच्या या बायोपिकच्या स्टारकास्टबद्दल मात्र रोज नवीन बातम्या येत असतात. 

सर्वप्रथम भन्साळींच्या या बायोपिकमध्ये इरफान खान मुख्य भूमिकेत झळकणार असे म्हटले जात होते. त्यानंतर सलमान खानच्या नावाची देखील चर्चा झाली होती. पण आता अभिषेक बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन- प्रियंका चोप्राची जोडी दिसणार अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. नंतर पीसीने अभिषेकसोबत काम करण्यास नकार दिल्याचे म्हटले गेले. त्यामुळे तिच्या नकारानंतर या बायोपिकमध्ये अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चनची वर्णी लागली असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर या चित्रपटात तापसी पन्नू काम करणार असल्याचे वृत्त काही वर्तमानपत्रांनी दिले होते. पण आता तापसी नव्हे तर संजय लीला भन्साळीची आवडती अभिनेत्री या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे म्हटले जात आहे.

दीपिका पादुकोणने आजवर संजय लीला भन्साळीसोबत बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटात काम केले आहे आणि हे दोन्ही चित्रपट चांगलेच हिट झाले आहेत. त्यामुळेच संजय लीला भन्साळी यांनी पुन्हा एकदा दीपिकाच्या नावाला पसंती दिली असल्याचे म्हटले जात होते. दीपिका या चित्रपटात अमृता प्रितम यांची व्यक्तिरेखा साकारणार असल्याचे वृत्त अनेक वर्तमानपत्रांनी दिले होते. तसेच साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकचे नाव केवळ साहिर लुधियानवी यांच्या नावावर न ठेवता अमृता प्रितम यांच्या नावाचा देखील नावाच्या शीर्षकात समावेश केला जावा अशी अट दीपिकाने ठेवली असल्याचे देखील वृत्त मीडियात आले होते. पण आता दीपिका देखील या चित्रपटाचा भाग नसणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकमध्ये अमृता प्रितम यांच्या भूमिकेत कोण असणार याची घोषणा चित्रपटाच्या टीमकडून कधी केली जाणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

Web Title: Deepika Padukone is not in Sanjay Leela Bhansali's film on Sahir Ludhianvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.