दीपिका पादुकोण आणि तिच्या या नणंदेमध्ये आहे अबोला?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 05:38 PM2018-10-22T17:38:42+5:302018-10-22T17:41:28+5:30

रणवीरची एक बहीण आणि दीपिका यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून भांडण आहे. त्यांच्यात भांडणं होण्यामागे एक खास कारण आहे. 

deepika padukone and sonam kapoor has cold war? | दीपिका पादुकोण आणि तिच्या या नणंदेमध्ये आहे अबोला?

दीपिका पादुकोण आणि तिच्या या नणंदेमध्ये आहे अबोला?

googlenewsNext

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या लग्नाची बातमी नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या फॅन्सना दिली आहे. १४ व १५ नोव्हेंबर या दिवशी त्यांचे लग्न आणि लग्नाच्या आधीचे विधी पार पडणार आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, रणवीरची एक बहीण आणि दीपिका यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून भांडण आहे. त्यांच्यात भांडणं होण्यामागे एक खास कारण आहे. 

रणवीर सिंगची ही बहीण दुसरी कोणीही नसून अभिनेत्री सोनम कपूर आहे. सोनमची आई सुनीता कपूर आणि रणवीरचे वडील जगजीत सिंग भवनानी हे भाऊ-बहीण आहेत. या नात्याने सोनम ही दीपिकाची नणंद बनणार आहे. सोनम ही रणवीरची लाडकी बहीण आहे. पण बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यापासूनच दीपिका आणि सोनम यांच्यातील नाते चांगले नाहीये. या दोघांच्या भांडणाला सुरुवात अनेक वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 मध्ये झाली. दोघींनी बॉलिवूडमध्ये 2007 मध्ये पदार्पण केले. दीपिकाचा ओम शांती ओम आणि सोनमचा सावरिया हा चित्रपट एकाच दिवशी म्हणजेच 9 नोव्हेंबर 2007 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटापासूनच या दोघींमध्ये टशन आहे असे म्हटले जाते. एवढेच नव्हे तर सावरिया या चित्रपटात सोनम आणि रणबीर कपूर एकत्र झळकले होते. या चित्रपटाच्या वेळी त्या दोघांच्या नात्याची चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. पण दीपिका आणि रणबीर यांच्यात आलेल्या जवळकीमुळे सोनम आणि रणबीरचे नाते तुटले असल्याचे म्हटले जाते. पण रणबीर आणि कॅटरिना कैफ यांचे अफेअर सुरू झाल्यावर दीपिकाआणि सोनम यांच्यातील कटुता कमी झाली होती. त्यांच्यात सगळे काही आलबेल आहे असे सगळ्यांना वाटत असतानाच दीपिका आपल्या पीआरच्या मार्फत सोनमच्या विरोधात बातम्या देत असल्याचे सोनमला कळले आणि पुन्हा एकदा त्यांच्यात भांडणं झाली. 

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या एका सिझनमधील एका भागात त्या दोघी एकत्र झळकल्या होत्या. त्यावेळी देखील त्यांच्या उत्तरांमधून त्यांच्यात असलेला वाद सगळ्यांना दिसून आला होता. 

Web Title: deepika padukone and sonam kapoor has cold war?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.