deepika padukone and salman khan may star in sanjay leela bhansali film inshallah | रणवीर- दीपिका नाही तर आता सलमान-दीपिकाची जोडी! भन्साळी लागलेत कामाला!!
रणवीर- दीपिका नाही तर आता सलमान-दीपिकाची जोडी! भन्साळी लागलेत कामाला!!

सलमान खानसोबत काम करण्याची संजय लीला भन्साळींची भरून इच्छा होती. पण गेल्या काही वर्षांत त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. आता मात्र त्यांनी पुरते मनावर घेतलेले दिसतेय. होय, ताजी बातमी तरी तशीच आहे. भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात सलमान खान लीड रोलमध्ये दिसेल. विशेष म्हणजे, यात सलमानच्या अपोझिट दीपिका पादुकोण हिला कास्ट केले जाणार असल्याचीही चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गत महिन्यात भन्साळी या चित्रपटाचे टायटल रजिस्टर केले. तथापि चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण करण्यासाठी भन्साळींना आणखी सहा-आठ महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे पुढील वर्षी या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल, अशी शक्यता आहे. या चित्रपटात भन्साळींना सलमान आणि दीपिकाला कास्ट करायचे आहे. दीपिकासोबत भन्साळींनी तीन चित्रपट केले आहे. बॉक्सआॅफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या या तिन्ही चित्रपटांत ती लीड अ‍ॅक्ट्रेस होती. शिवाय या तिन्ही चित्रपटात रणवीर सिंग तिचा हिरो होता. रणवीर व दीपिकाची जोडी प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती. पण आता रणवीरला बाद करत, भन्साळी दीपिका व सलमानची जोडी पडद्यावर आणत प्रेक्षकांना सरप्राईज देऊ इच्छितात.
सलमानबद्दल सांगायचे तर सलमान सध्या ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. हा चित्रपट संपताच तो ‘दबंग3’मध्ये बिझी होणार आहे. दीपिकाकडे तूर्तास कुठलाही चित्रपट नाही. यावर्षी अखेरि ती व रणवीर दोघेही लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा आहे.


Web Title: deepika padukone and salman khan may star in sanjay leela bhansali film inshallah
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.