Deepika Padukone and Ranvir Singh copy Virat Kohli-Anushka Sharma's copy? | विराट कोहली-अनुष्का शर्माची कॉपी करणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग?

सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या लग्नानंतर सगळ्यांना उत्सुकता आहे ती दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची.बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी सध्या त्यांच्या लग्नाच्या विषयाला घेऊन चर्चेत आहे.मीडियामध्ये रोज त्यांच्या लग्नाबाबत नवे खुलासे होत असतात. रणवीर-दीपिकाला सुद्धा विराट आणि अनुष्का प्रमाणे डेस्टिनेशन वेडिंग करायचे आहे. दीपिकाच्या बर्थडेच्या दिवशी दोघांनी फक्त कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकल्याची चर्चा आहे. मात्र दीपिकाने ही बातमी केवळ अफवा असल्याचे सांगितले होते. डीएनएच्या रिपोर्टनुसार हे कपल नोव्हेंबरमध्ये लग्न करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यासाठीची तयारी सुरू सुद्धा झाली आहे तसेच इटलीमध्येच हे दोघे लग्न करण्याची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी दोघे स्वित्झर्लंडमध्ये लग्न करणार अशीदेखील चर्चा होती.  याआधी विराट आणि अनुष्काने सुद्धा डेस्टिनेश वेडिंगसाठी याच देशाची निवड केली होती. दीपिका-रणवीरला लग्नासोहळ्याला प्रायव्हेट ठेवायचा आहे. 

ALSO READ :  आईसोबत दागिणे खरेदी करताना दिसली दीपिका पादुकोण; ही ‘वेडिंग शॉपिंग’ तर नाही?

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार दीपिका आणि रणवीरचे लग्न 18 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 19 नोव्हेंबरला लग्न होणार आहे. लग्नाच्या तयारीत कसू भरही कसल्याच गोष्टीची कमी पडू नये यासाठी दीपिकाच्या टीममधील प्रत्येकाला नोव्हेंबरमध्ये एकही सुट्टी घ्यायची नाही अशी ताकिद देण्यात आली आहे. दीपिकाच्या मेकअप आर्टिस्ट पासून ते मॅनेजरपर्यंत सगळ्यांना लग्नादरम्यान हजर राहण्याचे आदेश आहेत. अजून दीपिकाच्या पीआर टीमकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी दीपिका आपल्या आईसोबत दागिण्यांची खरेदी करताना दिसली होती. बंगळुरु आणि मुंबईतल्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली आहे. ऐवढेच नाही तर लग्नानंतर राहण्यासाठी डिप्पी आणि रणवीरने त्याच्या आई-वडिलांच्या अपार्टेमेंटमध्ये घरं सुद्धा खरेदी केले आहे. 

Web Title: Deepika Padukone and Ranvir Singh copy Virat Kohli-Anushka Sharma's copy?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.