नवरात्रोत्सवातील या खास मुहूर्तावर होणार दीपिका पादुकोण- रणवीर सिंगच्या लग्नाची घोषणा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 08:05 PM2018-10-07T20:05:42+5:302018-10-07T20:07:02+5:30

दीपवीर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार, अशी सुरूवातीला चर्चा होती. मध्यंतरी नोव्हेंबरचे मुहूर्त पुढील वर्षाच्या सुरूवातीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे समजले होते. आता एक ताजी बातमी आहे, त्यानुसार, रणवीर व दीपिका लवकरच आपल्या लग्नाची घोषणा करणार आहेत.

deepika padukone and ranveer singh to officially announce wedding in navratri | नवरात्रोत्सवातील या खास मुहूर्तावर होणार दीपिका पादुकोण- रणवीर सिंगच्या लग्नाची घोषणा?

नवरात्रोत्सवातील या खास मुहूर्तावर होणार दीपिका पादुकोण- रणवीर सिंगच्या लग्नाची घोषणा?

googlenewsNext

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूडचे क्यूट कपल चित्रपटांपेक्षा सध्या त्यांच्या लग्नाच्याच बातम्यांमुळे अधिक चर्चेत आहेत. सूत्रांचे मानाल तर हे कपल इटलीत डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. दीपवीर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार, अशी सुरूवातीला चर्चा होती. मध्यंतरी नोव्हेंबरचे मुहूर्त पुढील वर्षाच्या सुरूवातीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे समजले होते. आता एक ताजी बातमी आहे, त्यानुसार, रणवीर व दीपिका लवकरच आपल्या लग्नाची घोषणा करणार आहेत. हा मुहूर्त आहे १७ आॅक्टोबरचा. नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर लग्नाची घोषणा करण्याचा निर्णय दीपिका व रणवीरने घेतला असल्याचे कळतेय. डीएनएने याबाबतचे वृत्त दिले आहे. आता यात किती तथ्य आहे, ते तर येत्या १७ तारखेलाचं कळेल. तोपर्यंत अर्थातचं प्रतिक्षा..!

रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या ‘रामलीला’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा आहे. अद्याप दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मान्य केलेले नाही. पण सार्वजनिक ठिकाणी अप्रत्यक्षपणे ते मान्य करण्यात त्यांनी कुठलीही कसूर ठेवलेली नाही.
दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे तर रणवीर सध्या ‘सिम्बा’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ‘गली ब्वॉय’ आणि १९९३ व्या क्रिकेट वर्ल्ड कप विजयावर आधारित ‘८३’ या चित्रपटातही तो बिझी आहे. इतकेच नाही तर करण जोहरच्या ‘तख्त’ या मल्टीस्टारर चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे. दीपिकाचे म्हणाल तर ‘पद्मावत’नंतर तिने दिग्दर्शिका  मेघना गुलजारचा नवा प्रोजेक्ट साईन केला आहे.मेघना गुलजार ‘राजी’, ‘तलवार’ अशा दमदार चित्रपटांसाठी ओळखली जाते. मेघनाच्या ‘राजी’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल दिसले होते. मेघनाचा हा चित्रपट समीक्षक व प्रेक्षक दोघांनीही डोक्यावर घेतला होता. ‘राजी’नंतर मेघना अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या संवेदनशील मुद्यावर चित्रपट घेऊन येतेय. यात दीपिकाची वर्णी लागली आहे. साहजिकचं या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिची ही व्यक्तिरेखा अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी हिच्यापासून प्रेरित असेल.

Web Title: deepika padukone and ranveer singh to officially announce wedding in navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.