माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योतसिंह सिद्धू यांना क्रिकेट अन् बॉलिवूड चाहतेही चांगले ओळखून आहेत. परंतु तुम्हाला त्यांच्या मुलीविषयी माहिती आहे काय? नवज्योत टीव्हीवर जबरदस्त लोकप्रिय आहेत, परंतु आजकाल त्यांची मुलगी सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. होय, त्यांची मुलगी राबिया सिद्धू खूपच ग्लॅमरस असून, तिचे सौंदर्य बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींना मात देणारे आहे. क्रिकेटपटू ते राजकीय नेता असलेले नवज्योत ‘कॉमेडी नाइट विद कपिल’ या शोसह बºयाचशा कॉमेडी शोचा भाग बनले आहेत. क्रिकेट आणि राजकारणासह टीव्हीचे त्यांना प्रचंड आकर्षण असून, आपल्या मिश्किल अंदाजाने ते आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. परंतु त्यांची मुलगी राबिया पूर्णपणे ग्लॅमर दुनियेत रंगली असून, लवकरच बॉलिवूडमध्ये तिची एंट्री होण्याची शक्यता आहे. 


राबिया सिद्धू फॅशन आणि पार्ट्यांची शौकीन आहे. राबियाला फॅशन डिझायनिंगची आवड आहे. त्यामुळे तिला फॅशन डिझायनर बनायचे आहे. राबिया सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नियमितपणे तिचे बोल्ड फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते. राबिया तिच्या मित्रांसोबतच अधिक वेळ व्यतित करणे पसंत करते. आई आणि वडील राजकारणात असल्याचा तिच्यावर कुठलाही परिणाम दिसून येत नाही. ती तिच्याच दुनियेत रमणे पसंत करते. राबियाने पाथवेज वर्ल्ड स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यानंतर तिने सिंगापूर येथे फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले. 

वास्तविक राबिया स्वत:ला फॅशन डिझायनर म्हणूनच संबोधते. परंतु तिचा बोल्ड अंदाज बघून याबाबतचा अंदाज लावला जात आहे की, आगामी काळात ती बॉलिवूड चित्रपटांकडे वळण्याची शक्यता आहे. राबिया फेसबुकवर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असल्याने तिच्या फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र आपल्या खासगी जीवनात कोणी डोकावणे तिला अजिबात आवडत नाही. 
Web Title: 'This' is the daughter of a former cricketer, will soon be entering Bollywood, see photo!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.