Dattani gave 'only' feedback on step girls' bikini photoshoot !! | सावत्र मुलीच्या बिकिनी फोटोशूटवर मान्यता दत्तनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया!!

अभिनेता संजय दत्त सध्या त्याच्या ‘संजू’ या बायोपिकवरून चर्चेत आहे. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्याशी निगडित अनेक रहस्य उलगडणार आहेत. दरम्यान, सध्या संजूबाबाबरोबरच त्याची मुलगी त्रिशालादेखील चांगलीच लाइमलाइटमध्ये आली आहे. नुकतेच त्रिशालाने बिकिनी फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो सध्या सर्वत्र व्हायरलही होत आहेत. आता तिच्या या फोटोशूटवर संजय दत्तची पत्नी आणि त्रिशालाची सावत्र आई मान्यता दत्तने प्रतिक्रिया दिली आहे. बिकिनी फोटोवरून त्रिशाला सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. त्रिशालाने तिचे हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. त्रिशालाच्या या बिकिनी फोटोला तिच्या चाहत्यांकडूनही चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. आता तर तिच्या सार्वत्र आई मान्यताने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मान्यताने त्रिशालाच्या फोटोला ‘दिल आणि किस’च्या इमोजी शेअर केल्या आहेत. मान्यता आणि त्रिशालामध्ये नेहमीच चांगली बॉण्डिंग बघावयास मिळाली आहे. आता पुन्हा एकदा ती या फोटोनिमित्त दिसून आली. वास्तविक दोघीही एकमेकींच्या सोशल मीडिया पोस्टवर कॉमेंट करीत असतात. काही काळापूर्वी ही बातमी आली होती की, संजय दत्त प्रॉडक्शन लवकरच त्रिशालाला लॉन्च करणार आहे. मात्र ही अफवा असल्याचे नंतरच्या काळात स्पष्ट झाले. दरम्यान, त्रिशालाच्या बॉलिवूड एंट्रीवरून संजय दत्तने म्हटले की, ‘मी माझ्या मुलीच्या शिक्षणावर खूप पैसा खर्च केला आहे. तिने फॉरेन्सिक सायन्समधून स्पेशलायजेशन केले आहे. अशातही तिला जर चित्रपटांमध्ये यायचे असेल तर तिला हिंदी शिकावी लागेल. कारण बॉलिवूडमध्ये तिचे इंग्लिश काही कामाचे नाही. 
Web Title: Dattani gave 'only' feedback on step girls' bikini photoshoot !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.